📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

उमापूर चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कथित वाळू वाहतुकीवर स्थानिकांचा सवाल; “अगोदर आपल्या कर्मचाऱ्यांच्या गाड्या बंद करा”

उमापूर चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कथित वाळू वाहतुकीवर स्थानिकांचा सवाल; “अगोदर आपल्या कर्मचाऱ्यांच्या गाड्या बंद करा”
गेवराई प्रतिनिधी —
बीड जिल्ह्यात अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असताना, काही पोलीस कर्मचाऱ्यांवरच कथितरित्या वाळू वाहतुकीत सहभाग असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे “अगोदर आपल्या कर्मचाऱ्यांच्या वाळूच्या गाड्या बंद करा, तरच इतर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई होईल,” अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
               स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, उमापूर पोलीस चौकीतील एका कर्मचाऱ्याच्या भावाच्या नावावर दोन हायवा गाड्या असून, त्या गेल्या नऊ महिन्यांपासून पासिंगविना सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. राक्षसभुवन, सुरळेगाव, पांचाळेश्वर परिसरातून या गाड्या नियमितपणे वाळू वाहतूक करताना दिसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, “जर पोलीस विभागातीलच काही कर्मचारी वाळूच्या व्यवसायात गुंतले असतील, तर सामान्य वाळू माफियांवर कारवाई करताना प्रशासनाची विश्वासार्हता कशी टिकणार?” असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच अवैध वाळू उपशाला संरक्षण देणाऱ्यांनाही प्रशासनाने पाठीशी घालू नये, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. याबाबत पोलीस प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.
Back to top button