बीड

पेपरववाल्यांचे उपकार मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला ; प्रसारमाध्यमांच्या दणक्याने महावितरण ताळ्यावर एका दिवसात वीजपुरवठा सुरळीत केला :- डॉ.गणेश ढवळे 

पेपरववाल्यांचे उपकार मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला ; प्रसारमाध्यमांच्या दणक्याने महावितरण ताळ्यावर एका दिवसात वीजपुरवठा सुरळीत केला :- डॉ.गणेश ढवळे
—-
लिंबागणेश:- ( दि.२७ ) बीड तालुक्यातील लिंबागणेश उपकेंद्रातील बोरखेड फिटरचे केबल ३ दिवसांपूर्वी जळाल्याने महाजनवाडी येथील शेतकऱ्यांच्या जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता.काल शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्याशी संपर्क साधुन अडचण सांगितल्यानंतर याविषयी डॉ.गणेश ढवळे यांनी विविध दैनिकात बातम्या प्रसिद्ध केल्या.याची दखल घेऊन २ दिवसांपासून शेतकऱ्यांचा फोन न उचलणारे महावितरणचे अभियंता अभिजित शिंदे यांची वरीष्ठ आधिका-यांनी कानउघडणी करताच अभियंत्यांने स्वतः शेतकऱ्यांशी फोन वर संवाद साधत जळालेले केबल वायर बदलुन दिल्याने वीजपुरवठा सुरळीत झाला असुन जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असुन याबद्दल सरपंच विश्वंभर गिरी,भिमराव सुरवसे, युवराज सुरवसे यांनी डॉ . गणेश ढवळे यांच्याशी संवाद साधताना पेपरवाल्यांचे उपकार झाले म्हणत कृतज्ञता व्यक्त केली .
        ३ दिवसांपूर्वी लिंबागणेश उपकेंद्रातील बोरखेड फिटरचे केबल जळाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. सरपंच विश्वंभर गिरी यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांच्याशी संपर्क साधत महावितरणचे अभियंता २ दिवसांपासून फोन उचलत नसल्याने आपण लक्ष देण्याची विनंती केली. डॉ.गणेश ढवळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांची व्यथा विविध दैनिकात प्रसिद्ध केली.दैनिकातील बातमींची महावितरणच्या वरीष्ठ आधिका-यांनी दखल घेत अभियंता शिंदे यांची कान उघडणी केल्यानंतर शिंदे यांनी सरपंच विश्वंभर गिरी व शेतकऱ्यांशी संवाद साधत आज दुपारी जळालेले केबल बदलून दिले.वीजपुरवठा सुरळीत झाल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असुन सरपंच विश्वंभर गिरी, शेतकरी अभिमान सुरवसे, युवराज सुरवसे यांनी प्रसारमाध्यमांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.
Back to top button