बीड
आदित्य शिक्षण संस्थेत राबवली जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम

—-
समता पंधरवाडा : जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासह शासनाच्या विविध योजनेची विद्यार्थ्यांना दिली माहिती
—
प्रतिनिधी | बीड अनुसूचीत जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग एस .ई. बी. सी. (मराठा) या मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड यांचे वतीने महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीचे औचित्य साधून ‘समता पंधरवडा’ या विशेष मोहिमेचे आयोजन बीड शहरातील आदित्य शिक्षण संस्थेत करण्यात आले होते.
‘समता पंधरवडा’ कालावधी १ ते १४ एप्रिल दरम्यान राबवण्यात आला. यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळणे साठी विशेष मोहिम राबवण्यात आली. आदित्य शिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमाला संगणक विभाग प्रमुख प्रा. सलीम शेख, कार्यालयीन अधीक्षक जात पडताळणी कार्यालय बीडचे गणेश शेजाळ, प्रकल्प अधिकारी बार्टी ज्ञानोबा मात्रे, समतादूत बार्टीचे ज्ञानोबा गुजर, सहाय्यक जातपडताळणी कार्यालय बीड च्या साधना मस्के यांची उपस्थिती होती. यावेळी गणेश शेजाळ यांनी महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांसाठी चालू असलेल्या योजना जसे की स्वाधार योजना,पंडीत दीनदयाल स्वयम् योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ.आदित्य सारडा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीच्या कार्यकारी सदस्या तथा आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा, आदित्य पॉलिटेक्निक बीड चे प्राचार्य डॉ. राहुल खडके यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. लक्ष्मण तांबे यांनी मानली. यावेळी प्रा. सलीम शेख,प्रा. प्रशांत दुधाळ, प्रा. अजय दुधाळ, प्रा. पी. आर. अ,प्रा. अक्षय राऊत, प्रा. शिवानी जाधव, प्रा. मिन्हाज शेख यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम पवार, प्रा. प्रियंका नागरगोजे यांनी परिश्रम घेतले.
—-
महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्रासाठी शिबिर- प्रकल्प अधिकारी ज्ञानोबा मात्रे
—–
प्रकल्प अधिकारी बार्टी ज्ञानोबा मात्रे म्हणाले की, अनुसूचीत जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग, सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग एस ई बी सी (मराठा) या मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येत आहे. त्याकरिता संबंधित मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरून सदर अर्जाची हार्ड कॉपी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड यांचेकडे सादर करावेत. तसेच बीड जिल्हयातील काही महाविद्यालयामध्ये समितीमार्फत शिबिरे आयोजित करण्यात आलेले असून त्याच ठिकाणी संबंधित अर्ज स्वीकारून त्यांना तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
======
स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना निशुल्क प्रशिक्षण- संजय गुजर
—-
बार्टीचे अधिकारी संजय गुजर
म्हणाले की, बार्टी मार्फत एससी, एसटी विद्यार्थ्यांना एमपीएससी, युपीएससी, आयबीपीएस, जी, नीट, GRE-TOEFL, ई घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा करिता ‘विना शुल्क अनिवासी प्रशिक्षण’ आणी अभ्यास सामग्री दिली जाते. त्याचबरोबर ठरावीक असे प्रती महा विद्या वेतनही पुरवले जाते. तसेच पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेस पात्र ठरल्यास ठरावीक ‘लोकसेवा आयोग व नागरी सेवा परिक्षा’ प्रमाने आर्थीक मदत दिली जाते. त्या संदर्भात तज्ज्ञ व्यक्ती मार्फत मार्गदर्शन पुरवले जाते. तसेच महा ज्योती मार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास – प्र वर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, JEE/NEET/MHT-CET, MPSC, UPSC आदी स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते.