📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जामखेड भाजपकडून ; पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जामखेड भाजपकडून ; पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

जामखेड प्रतिनिधी : देशाचे माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी जामखेड शहराच्या वतीने आज दिनांक ३ जून २०२६ रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्व. मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.

कार्यक्रमास भाजपा ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, सभापती पै. शरद कार्ले, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, बांधकाम समितीचे सभापती तथा नगरसेवक मोहन पवार,अनिल यादव,युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, गोरख घनवट, माजी नगरसेवक दिगंबर चव्हाण, नगरसेवक पवन राळेभात,मोहन मामा गडदे,डॉ. विठ्ठल राळेभात, युवा नेते विष्णू गंभीरे, ऋषिकेश मोरे, डॉ. अशोक बांगर, गणेश राळेभात, उध्दव हुलगुंडे,तुषार बोथरा, सोमनाथ कदम यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया
——————————-
ग्रामीण भागातील गरीब, वंचित आणि शेतकरी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या कार्यामुळे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात भक्कम पाया मिळाला. आजही त्यांचे विचार आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली आत्मीयता प्रेरणादायी आहे.

– बाजीराव गोपाळघरे

Back to top button