📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

निसर्ग रक्षण ही सामूहिक जबाबदारी – सभापती पै.शरद कार्ले

निसर्ग रक्षण ही सामूहिक जबाबदारी – सभापती पै.शरद कार्ले

जामखेड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत वृक्षारोपण

जामखेड प्रतिनिधी – दि.२६ जूननिसर्गाचं रक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. वाढते प्रदूषण, तापमान आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने झाडे लावून त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे. बाजार समिती परिसर हरित व्हावा, हा आमचा संकल्प आहे.असे प्रतिपादन सभापती पै.शरद कार्ले यांनी केले.

जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात २६ जून २०२५ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी ते बोलत होते.
यावेळी समितीचे सभापती पैलवान शरद कार्ले, संचालक राहुल बेदमुथ्था, सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे, सचिव वाहेद सय्यद, किरण मोरे, अशोक यादव यांची उपस्थिती होती. तसेच व्यापारी संघटनेचे अध्यक्ष-रमेश जरे ,सचिव -मारूती काळदाते,भागवतराव पवार,संतोष बोरा,विनोद नवले,भरत शिंदे, दादा सरडे, दादा काळदाते,दादा भोईटे,भाऊ कार्ले,सुभाष भंडारी ,पिंटु खाडे, विशाल नेटके, संदिप दहिकर ,संजय चौभारे आदी बाजार समितीचे पदाधिकारी, कर्मचारी आणि व्यापारी ,स्थानिक नागरिकही उपस्थित होते. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.

Back to top button