बीड

आमदार बाबाजी काळे यांनी पावसाळी अधिवेशनात शेतकरी , कामगार , व पाणी प्रश्नावर विविध मुद्दे मांडले .

आमदार बाबाजी काळे यांनी पावसाळी अधिवेशनात शेतकरी , कामगार , व पाणी प्रश्नावर विविध मुद्दे मांडले .

सुहास सावंत / पुणे:-खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी गुरुवारी (दि. ३) महाराष्ट्र विधानसभेत नियम २९३ अंतर्गत आपल्या मतदारसंघातील शेतकरी आणि पाणी प्रश्नांवर विविध मुद्दे मांडले.

आमदार काळे म्हणाले की, खेड तालुक्यातील भामा-आसखेड, कळमोडी आणि चासकमान प्रकल्पातून शेतकऱ्यांना शेतीप्रयोजनार्थ पाणी मिळावे म्हणून हे धरण बांधण्यात आले. तत्कालीन सत्ताधाऱ्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला पाणी दिले जात आहे. यामुळे खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. दोन्ही महापालिकांनी या प्रकल्पातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी निधी द्यावी, अशी आग्रही मागणी केली.
पुनर्वसन प्रश्न मांडताना आमदार काळे म्हणाले की, खेड तालुक्यात रेल्वे, रिंगरोड, ३ धरणे, एमआयडीसीचे ५ टप्पे, सेझ व प्रास्तावित औद्योगिक महामार्ग यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन झाले. कित्येक शेतकऱ्यांना अजूनही पुनर्वसनाची जमीन मिळालेली नाही. राजकीय दबाव आणून टेमघर व गुंजवणी प्रकल्पग्रस्ताना खेड तालुक्यात जमिनी दिल्या जात आहेत. शासनाने हे प्रस्ताव स्वीकारू नये.
शेतकऱ्यांना हमीभाव, पीककर्ज आणि अखंडित वीजपुरवठा मिळाला पाहिजे याबाबत आमदार काळे म्हणाले की, खेड तालुक्यातील शेतकरी अजूनही पाणी, हमीभाव, वीज आणि पीककर्ज या गोष्टींसाठी संघर्ष करत आहेत. पॉलिहाऊससाठी १० गुंठ्यांनाही अनुदान मिळावे, दूध व्यवसायाला चालना द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
एमआयडीसीमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळावा हे निदर्शनास आणून देताना आमदार काळे यांनी सांगितले की, एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या पण मोबदला अजून मिळालेला नाही. दलालांमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे थांबवून शेतकऱ्यांना थेट लाभ मिळावा.
पश्चिम भागातील शेतकरी वाचवण्यासाठी योजना राबवा अशी कळकळीची विनंती आमदार काळे यांनी केली. पश्चिम भागातील आदिवासी शेतकऱ्यांना पाणंद रस्ते, बंधारे, हिरडा प्रक्रिया केंद्र यासारख्या योजना तातडीने मंजूर कराव्यात. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीची मदत व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘जय जवान, जय किसान, राम कृष्ण हरी!’ असा समारोप करीत शेवटी आमदार बाबाजी काळे म्हणाले की, शेतकरी हा आपल्या देशाचा आधार आहे. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे

Back to top button