राजकीय

फडणवीसांमुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला अन् नागरिकांना पुराचा फटका बसला

 

राज्यात मागच्या दोन महिन्यापूर्वी पडलेल्या धोधो पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात महापुर आला होता. याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाडाले होते . त्यातच आता या प्रकरणात समाजकी कार्यकर्त्या मेघा पाटकर यांनी या सर्व गोष्टीना तत्कालीन फडणवीस सरकार यांनाच कारणीभूत ठरवले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला असून नागरिकांना पुराचा फटका सहन करावा लागत आहे, अशी टीका पाटकर यांनी केली आहे.

मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे की, पूररेषा आणि नदीची पाणीपातळी यामधील फरक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळाला नाही. त्यामुळे त्यांनी क्रिडाईनं पूर रेषेच्या बाबतीत दिलेला अहवाल स्वीकारला. शिवाय निळा आणि लाल रेषेतील बांधकामांना सरसकट सूट दिली. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पुराचा सामना करावा लागत आहे.

पुढे बोलताना त्या म्हणल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवर जाऊन पर्यावरणासंदर्भात मोठमोठी वक्तव्य करत आहेत..मात्र त्याच वेळी देशात काय परिस्थिती सुरू आहेत याकडे मात्र दुर्लक्ष आहे, अशी देखील टीका मेधा पाटकर यांनी केली आहे. रायगड, चिपळून, कोल्हापूर आणि सांगली आलेल्या महापुराने भविष्यातील धोक्याचा इशारा दिला आहे. केवळ सरकारच सर्व प्रश्न सोडवेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे असं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

Back to top button