महाराष्ट्रमुंबई

शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीला मुंबई पोलिसांचं समन्स !

 

राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु केले आहेत. त्यातच आता या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानीला मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या रडारवर आली असून मुंबई पोलिसांनी पूजाला समन्स बजावले आहे. मुंबई पोलीस किरण गोसावी खंडणी प्रकरणाचा तपास करत आहेत.

मात्र दुरीकडे प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत पूजा ददलानीने मुंबई पोलिसांकडे आणखी वेळ मागितला आहे. पूजा ददलानी शाहरुख खानची मॅनेजर आहे. यापूर्वी, एका सायबर तज्ञाने आणि हॅकरने दावा केला होता की, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) काढण्यासाठी पूजा ददलानीसह काही लोकांच्या व्हॉट्सअॅप चॅट्स एडिट करण्यासाठी दोन लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. मनीष भंगाळे असे या हॅकरचे नाव आहे. दाखवलेल्या व्हॉट्सअॅप चॅटची बॅकअप फाइल आर्यन खानच्या नावावर असल्याचा दावा भंगाळे यांनी केला होता.

प्रभाकर साईलच्या नावाने बनावट सिमकार्ड बनविण्यास सांगितले होते, असा मोठा दावा हॅकर मनीष बंगाळेने केला होता. जळगावात ६ ऑक्टोबरला आलोक जैन आणि शैलेश चौधरी नावाच्या दोघांनी माझ्याशी संपर्क साधला होता. यासाठी मला पाच लाख रुपयांची ऑफरही देण्यात आली होती तसंच जबरदस्तीने १० हजार रुपयेही देण्यात आले होते, असे दावे भंगाळेंनी केले होते.

Back to top button