राजकीय

हिंमत असेल तर..’ राऊत यांचे थेट नारायण राणेंना आव्हान

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीय महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये. त्यातच राणे यांच्या टिकेला शिवसेना सुद्धा सडेतोड उत्तर देताना दिसून आले आहेत. त्यातच आताशिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबियांवरही टीका केली आहे.

सिंधुदुर्ग येथे झालेल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये विनायक राऊत यांनी नारायण राणेंना आणि त्यांच्या मुलांना येथील जनतेने अनेकदा पराभूत केल्याचा उल्लेख करतानाच हिंमत असेल तर पुढील विधानसभा येथून लढवून दाखवावी. डिपॉझिट जप्त झालं नाही तर नाव लावणार नाही, असं थेट आव्हान दिलं आहे. “नारायण राणेंनी हिमंत असेल तर पुन्हा वैभव नाईक यांच्यासमोर कुडाळ, मालवणमधून निवडणुक लढवून दाखवावी. नाही त्यांच डिपॉझीट जप्त केलं तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही. हिंमत असेल तर रहा उभे विधानसभेला,” असं म्हणत राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.

“सिंधुदुर्ग जिल्ह्याने नारायण राणेंना दाखवून दिलंय दोनदा यांच्या पोराला आपटलं आणि एकदा यांना आपटलं,” असंही राऊत म्हणालेत. दिल्लीकरांना चांगलं वाटलं पाहिजे, मोदींना, अमित शाहांना चांगलं वाटलं पाहिजे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर राणे नको त्या शब्दात टीका करतात असा आरोपही यावेळी राऊत यांनी केला.

Back to top button