बीड
बहुजन समाजाची फसवणूक करणारा नेता, माजी नगर सेवक कपिल मस्के याच्या वर गुन्हे दाखल करावे – चंद्रकांत खरात सर. मराठवाडा संघटक,भिमशक्ती सामाजिक संघटना.

बहुजन समाजाची फसवणूक करणारा नेता, माजी नगर सेवक कपिल मस्के याच्या वर गुन्हे दाखल करावे – चंद्रकांत खरात सर. मराठवाडा संघटक,भिमशक्ती सामाजिक संघटना.
“खा. बजरंग सोनवणे यांनी बहुजन समाजाची फसवणूक करणाऱ्या, खंडणीखोर नगरसेवकाची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करावी.
केज/प्रतिनिधी:-केज येथील सोशल मिडीया वर व्हायरल आडीओ क्लिप प्रकरणाने संपूर्ण बीड जिल्हयात खळबळ माजवली असतांना आज दिनांक २१, ऑगस्ट रोजी केज रमाई नगर येथील गायरानच्या मुद्यावर भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजीत केली होती संबंधीत पत्रकार परिषदेत बोलताना भिमशक्ती सामाजिक संघटनेचे मराठवाडा संघटक, चंद्रकांत खरात सर यांनी स्वंय घोषीत नेता, माजी नगर सेवकावर गुन्हे दाखल करावे असे सांगितले.
केज शहरात दोन ते तीन दिवसा पासून सोशल मिडीयावर व्हायरल आडीओ क्लिप मुळे सर्वत्र खळबळ उडाली असून केज शहरातील रमाई नगर भागामध्ये शासकिय गायरान जमिनीवर दलीत समाजातील गोर गरीब, होतकरू अशा लोकांनी आपापली घरे तयार करून आपले वास्तव्य केले आहे, परंतु दलित समाजातील पावसाळ्यातील छत्री प्रमाणे उगवले ला स्वंयघोषीत नेता, माजी नगरसेवक दलित समाजाची फसवणूक करत असून स्वतःच्या स्वर्थासाठी दलीत समाजाला वेठीस धरून फसवणूक करत असल्याचे संबधीत आडीओ क्लिप वरून निदर्शनास येत आहे रमाई नगर केज येथील गायरान जमिनी प्रकरणी समाजाच्या नावाने दलाली करणाऱ्या तसेच समाजाच्या नावाने स्वतःची राजकिय पोळी भाजून स्वार्थ करु पाहणाऱ्या स्वंयघोषीत दलीत नेत्यावर, माजी नगरसेवका वर गुन्हे दाखल करावेत असे भिमशक्ती संघटने कडून आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना भिमशक्ती संघटने चे मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात सर यांनी सांगितले.
पुढे बोलताना भिमशक्ती संघटनेचे मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात सर यांनी सांगितले कि, स्वंय घोषीत, दलित नेता, माजी नगरसेवक कपिल मस्के हा शरद पवार राष्ट्रवादी गटाचा कार्यकर्ता असून या गटाचे खासदार साहेबांनी संबंधित, दलित समाजाच्या नावा खाली दलाली करून, समाजाला वेठीस धरून दलित समाजाची फसवणूक करून मड्यावरचे लोणी खाणाऱ्या, पावसाळ्यातील छत्री प्रमाणे उगवलेल्या नेत्याची,स्वंय घोषीत माजी नगरसेवकाची तात्काळ पक्षातून हाकलपट्टी करण्यात यावी अन्यथा भिम शक्ती संघटनेद्वारे खासदार यांना सदर प्रकरणी जाब विचारला जाईल असा इशारा देखील चंद्रकांत खरात सर यांनी दिला आहे. आणि रमाई नगर केज येथील गोर गरीब, होतकरू दलित समाजास न्याय द्यावा, तसेच सामाजातील नेत्यांना “डबडे” म्हणून त्यांची भर सभेत खिल्ली उडवणाऱ्या तसेच समाजाच्या नावाखाली दलाली करणाऱ्या माजी नगरसेवकास तात्काळ पक्षातून काढून टाकावे अन्यथा दलित समाजाच्या रोशाला खासदार सोनवणे यांना सामोरे जावा लागेल असे बोलताना चंद्रकांत खरात सर यांनी स्पष्ट केले आहे.रमाई नगर येथील गरीब, असहाय्य दलित समाजास खासदार, बजरंग बप्पा यांनी न्याय द्यावा, अन्यथा परिणामी प्रकरणाला खासदार सोनवणे जबाबदार राहतील भिमशक्ती सामाजिक संघटनेचे मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात सर यांनी केली.
प्रसंगी दलित समाजासाठी संबंधीत स्वंयघोषीत दलित नेत्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी रस्त्यावर उतरून, मोठा लढा उभा केला जाईल, गरीब, वंचित बहुजन, दलीत समाजाच्या झोळीतील खाणाऱ्या दलाल नेत्या वर गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच भिमशक्ती संघटनेच्या माध्यमातून दलित समाजासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण ताकतीने लढा देणार असल्याचे त्यांनी सांगीतले तसेच संबंधीत दलाल, मड्यावरचे लोणी खाणाऱ्या स्वंय घोषीत दलीत नेता, माजी नगरसेवक कपिल मस्के याच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत भिमशक्ती संघटनेच्या माध्यमातून दलित समाजासाठी लढा देवू असे त्यांनी सांगितले. तसेच भिमशक्ती संघटनेच्या च्या सर्व पदाधिकारी यांनी आपापल्या प्रतिक्रिया देवून दलित समाजाच्या अन्याया विरुद्ध एकजूटीने लढा देण्याचे सांगितले
यावेळी भिम शक्ती सामाजिक संघटनेचे मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात सर, अशोक सरवदे तालुका उपाध्यक्ष, शिवमुर्ती हजारे शहराध्यक्ष, भिम शक्ती संघटनेचे जेष्ठ नेते सुभाष सरवदे यांसह ‘ भिम शक्ती संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



