बीड
गेवराई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून अनिरुद्ध सानप रुज

गेवराई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून अनिरुद्ध सानप रुज
गेवराई पंचायात समितीची बी डी ओ खुर्चीचा संगीत खुर्ची खेळ चालूच..
कोळगाव, दि.२१ (बाळासाहेब घाडगे ):- गेवराई पंचायत समिती बीड जिल्ह्यात चर्चेत असून गटविकास अधिकारी श्रीमती कांबळे ह्या रजेवर नेहमीच जातात. बी डी ओ खुर्चीचा संगीत खेळ चालूच आहे. यामुळे पंचायत समितीच्या कामकाजावर परिणाम होतो. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि.२१ ऑगस्ट २०२५ पासून गटविकास अधिकारी म्हणून पंचायत समितीचे कृषी अधिकारी पदभार पाहणारे अनिरुद्ध सानप यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.
गेवराई पंचायत समितीमध्ये अनेक महिन्यापासून गटविकास अधिकारी खुर्ची संदर्भात फिरते आहे. अनेक महिन्यांपासून गटविकास अधिकारी किरकोळ रजा किंवा महिना रजा काळ घेतला जातो. यामुळे पंचायत समितीतील घरकुल विभाग असो किंवा रोजगार हमी योजना, नरेगा कक्ष, बांधकाम विभाग, गोरगरीब दलित वस्ती प्रस्ताव, कृषी विभागातील अधिकारी यांच्यावर नियंत्रण नसल्याने कर्मचारी अधिकारी फिरकत नसल्याने अधिकारी विना रिकाम्या खुर्च्या टेबल दिसतात. यामुळे जनतेचे कामे रेंगाळत होते. दरम्यान अतिरिक्त पदभार घेऊन आलेले बीडीओ म्हणून तीन चार आठवड्यांत परत बदलले जातात. यामुळे पंचायत समितीचा कारभारावर नियंत्रण ठेवणे अनागोंदीपणात वाढ होत होते. पण बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहेमान यांनी दि.२१ ऑगस्ट २०२५ रोजी पासून गटविकास अधिकारी म्हणून अनिरुद्ध सानप यांची निवड करण्यात आली आहे. तरी गेवराई पंचायात समिती याबाबतीत जिल्हा परिषदेचे सी ई ओ जितिन रहेमान यांनी समितीच्या कारभाराकडे लक्ष देवून कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नेमण्याची गरज आहे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाप्रमुख जयदिप गोल्हार यांनी केली.



