महाराष्ट्र

ईदच्या आनंदात आमदार रोहित पवार सहभागी; मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

ईदच्या आनंदात आमदार रोहित पवार सहभागी; मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

रमजान ईदनिमित्त जामखेडमध्ये सामुदायिक नमाज अदा

जामखेड : शहरातील ईदगाह मैदानावर सोमवारी (ता. ३१) मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान ईद निमित्त सामुदायिक नमाज अदा केली. यावेळी आमदार रोहित पवार यांनी उपस्थित राहून मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहर भाई काझी, मुख्तार सय्यद,प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, प्रकाश सदाफुले, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, प्रकाश काळे, उमरभाई कुरेशी,कुंडल राळेभात, प्रशांत राळेभात, वसिम सय्यद,डॉ.सादेख पठाण,संपत राळेभात,प्रविण उगले, महेंद्र राळेभात,पांडुरंग माने, महेश राळेभात, जुबेर शेख, अनिल रेडे, बिलाल शेख, आसिफ शेख आदी उपस्थित होते.

सकाळी ईदच्या नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने ईदगाह मैदानावर एकत्र येऊन नमाज अदा केली.नमाज पठणानंतर एकमेकांना शुभेच्छा देत गळाभेटी झाल्या. आमदार रोहित पवार यांनी या प्रसंगी मुस्लिम समाजाच्या आनंदात सहभागी होत, त्यांना शुभेच्छा दिल्या.

“रमजान ईद हा बंधुत्व, प्रेम आणि सौहार्दाचा सण आहे. समाजातील सर्व घटकांनी एकोप्याने सण साजरे करावेत,” असे आवाहन आमदार पवार यांनी केले.

या वेळी शहरातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमजान ईदच्या निमित्ताने संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण होते.

रमजान ईद निमित्त पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

Back to top button