संपादकीय

विकासकामाच्या मंजुरीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ची दांडी; शिवसेना आक्रमक

 

जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री जयंत पाटील व त्यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजकीय श्रेयवादासाठी शहराच्या विकासाला खो घालत असल्याचा आरोप शिवसेना तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. या आरोपांमुळे पुन्हा एकदा आघाडीमध्ये बिघाडी असल्याचे चिन्ह दिसून आले आहे. आज नगरपालिकेत ११ कोटी रुपयांच्या विकासकामानां मंजुरी देण्यासाठी बोलावलेल्या विशेष सभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी दांडी मारली. त्यामुळे सभा रद्द करावी लागली. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने ही टीका केली.

ते म्हणाले, ” शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री यांच्याकडून शहराच्या विकासासाठी अकरा कोटी रुपये मिळणार आहेत. या निधीची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालिकेची विशेष सभा बोलावली होती. यापूर्वी तीनवेळा मागील सभा तहकुब केली आहे. हे कारण पुढे करीत ते उपस्थित राहिले नाहीत. मागील सभेचा या विशेष सभेचा काहीही संबंध नाही; परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नगरसेवकांना सभेस जाण्यास मनाई केल्याचे दिसत आहे. याचा शिवसेना जाहीर निषेध करीत आहे.”

नगरसेवक शकील सय्यद म्हणाले, “या ११ कोटींच्या निधीला विरोध म्हणजे जनतेच्या विकासाला विरोध आहे. शिवसेनेची अपेक्षापूर्ती होत आहे. हे श्रेय आपणास मिळणार नाही हा पोटशुळ आहे. फक्त कागद नाचवून सत्ता मिळवणे हे त्यांचे काम आहे. खरे कोण, खोटे कोण हे जनतेला माहीत आहे.

Back to top button