संपादकीय

एसटी संप मोडून काढाल तर तुमचा हिशोब करु, खोत यांचा आघाडी सरकारला इशारा

 

मुंबई | राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असताना काही ठिकाणी खासगी चालकांची मदत घेत शिवशाही आणि शिवनेरी बस सुरु करण्यात आला आहेत. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यात महाड येथे काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. पुणे, नाशिक आणि सांगली येथे शिवशाही बस सुरु करण्यात आल्या आहेत. संप तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचवेळी मुंबईत आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. यावेळी तुम्ही संप मोडून काढाल तर तुमचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी आघाडी सरकारला इशारा दिला आहे

दुसरीकडे राज्य सरकारने चर्चेची तयारी दाखवली आहे. मात्र, आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी सरकारवर आरोप केले आहे. परिवहनमंत्री अनिल परब तुम्ही चर्चेला कधी बोलावताय आम्ही तुमच्या निरोपाची वाट बघत बसलोय, असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत त्यामुळे आता पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून समोरासमोर येणार आहे.

सर्व विरोधी पक्षांना आवाहन करत आहोत, या आंदोलनात सहभागी व्हा. ही लढाई रस्त्यावर नेऊ. अनिल परब तुम्हाला मी इथे चर्चेसाठी बोलावतोय सगळ्यांसमोर चर्चा करू स्वतः विरोधी पक्षनेते उपस्थित राहतील. विलिनीकरण हे झालंच पाहिजे. आत्महत्या होत आहेत ते तुम्हाला दिसत नाहीत का?, उद्या आंदोलन आणखी तीव्र करणार १० वाजता आझाद मैदानावर बोर्ड घेऊन कुटुंबासहित बसणार आहोत, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिला.

Back to top button