📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

सारोळा प्रशालेत मातीचे किल्ले निर्मिती या उपक्रमाचे आयोजन…!

सारोळा प्रशालेत मातीचे किल्ले निर्मिती या उपक्रमाचे आयोजन…!

जामखेड (प्रतिनिधी):गुरूवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी अर्थातच शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रथम सत्राच्या अंतिम दिवशी व दिपावली उत्सवाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा या ठिकाणी ” मातीचे किल्ले निर्मिती ” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमात प्रशालेतील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
यावेळी प्रत्येक वर्गातील विद्यार्थांनी स्वतःचे गट करून मातीची किल्ले तयार करण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी केली.यामध्ये जागेची निवड,दगड,वीट,माती व पाणी यांचे संकलन,चिखल निर्मिती याची तयारी विद्यार्थांनी केली.प्रत्येक वर्गातील विद्यार्थांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार गटामध्ये अतिशय सुंदर व मनमोहक असे तोरणा ,प्रतापगड ,जंजिरा शिवनेरी यासारखे मातीचे किल्ले तयार केले.किल्ला तयार करत असताना विद्यार्थ्यांची मेहनत,सर्जनशीलता, एकाग्रता,कल्पकता,चिकाटी व नियोजन हे सर्व काही कौतुक करण्यासारखे होते.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सतीश मुळे व शाळेतील सर्व शिक्षक यांनी, विद्यार्थ्यांनी वर्गानुसार तयार केलेल्या मातीचे किल्ले याचे परीक्षण करून उत्कृष्ठ किल्ला तयार करणाऱ्या वर्गाचा यथोचित सन्मान केला.तसेच सर्वच विद्यार्थी यांचे कौतुक व अभिनंदन केले.छत्रपती शिवाजी महाराज यांची सामूहिकरित्या आरती करून सदर उपक्रमाची सांगता करण्यात आली.सदर उपक्रमामुळे मातीचे किल्ले निर्मिती या जुन्या परंपरेची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती मिळाली तसेच आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाबद्दल जाणीवजागृती झाली. गड किल्ल्याचे करुया संवर्धन, ऐतिहासिक वास्तूंचे करूया जतन असा मोलाचा संदेश सदर उपक्रमांच्या माध्यमातून देण्यात आला.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक माजीद शेख सर, पदवीधर शिक्षक सुरेश बर्वे सर,राहुल लिमकर सर ,उपाध्यापक प्रशांत होळकर सर, उपाध्यापिका शबाना शेख मॅडम,वृषाली खांदवे मॅडम व अमृता रसाळ मॅडम व सर्व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.सर्वांगसुंदर अशा उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंदांचे,जामखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय प्रदिप चव्हाण,,जामखेड बीट शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ,केंद्रप्रमुख सुरेश मोहिते,प्रभारी केंद्रप्रमुख झिंजुर्के मॅडम,तसेच आदर्श सारोळा गावचे आदर्श सरपंच ॲड.अजय काशिद,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश मुळे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे,पालक व ग्रामस्थ यांनी विविध माध्यमातून हार्दिक अभिनंदन करुन भविष्यातील उज्ज्वल शैक्षणिक वाटचाली करिता मनस्वी शुभेच्छा दिल्या.

Back to top button