गुरु गोरक्षनाथ नाथसांप्रदाय यांची गुरु धुनिनाथ महाराज यांच्या उपस्थित गुरु पौर्णिमा होणार साजरी

गुरु गोरक्षनाथ नाथसांप्रदाय यांची गुरु धुनिनाथ महाराज यांच्या उपस्थित गुरु पौर्णिमा होणार साजरी
शिरगाव प्रतिनिधी
चिपळूण तालुक्यातील कोंडफणसवणे येथील महादेव जाधव यांच्या गौरक्षनाथ मंदीरात गुरु धुनिनाथ महाराज यांच्या कृपा आर्शिवादाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे.
गुरु पौर्णिमा गुरुवार दिनांक 10 जुलै 2025
मृगस्थली स्थलीपुण्या भालनेपालमंडले ।
यत्र गोरक्षनाथेन मेघमालाऽऽसनीकृता ।।
नाथ संप्रदायातील महान गुरू म्हणजे “विश्वगुरु श्री गोरक्षनाथ महाराज
महायोगी श्रीगोरक्षनाथ यांना बोली भाषेत ‘गोरखनाथ’ या नावाने संपूर्ण भारतीय उपखंडात ओळखतात. दक्षिण भारतात ‘कोरक्कर नाधार’ हे त्यांचे नाव प्रचलित आहे. ‘गो’ म्हणजे इंद्रिये. इंद्रिये ताब्यात ठेवणारे ते “गोरक्षनाथ”
गुरू श्री धूनी नाथजी यांनी आपल्याला नाथ संप्रदायाची शिकवण हि आपल्या नाथपंथी चैल्यानां दिली जाते. आणि देत आहे.
गुरु धुनिनाथजी गुरूंची पूजा साधकांच्या सर्वांना हस्ते करण्यात येते.
गुरू पौर्णिमा कार्यक्रमाचे नियोजन प्रमाणे करण्यात येते.
सकाळी ठीक 9.00 वाजता श्री सद्गुरू गोरक्षनाथ यांना अभिषेक आणि पूजा ,
सकाळी 10.00 वाजता
गंगा पूजन व गंगा आरती,
सकाळी 11.00 वाजता
सर्व देवतांच्या आवाहन, जागृती, समस्त गुरू – शिष्य कल्याणार्थ हवन विधी करण्यात येते.
दुपारी 12.00 वाजता
नाथ संप्रदाय अनुग्रह विधी देण्यात येतो.
दुपारी 1 वाजता
आरती आणि नैवद्य आणि महाप्रसाद करण्यात येतो.
दुपारी 3.00 वाजता
गुरू श्री धुनी नाथ जी यांचे पूजन व आशीर्वाद आणि गुरुअमृत प्याला गुरुच्या हस्ते देण्यात येतो.
सायंकाळी 4 वाजता
गुरू आणि शिष्य मंडळी यांचे सत्संगातून चर्चा करण्यात येतो.
सकाळी वेळेत कार्यक्रम सुरूवात करण्यात येत असून पूर्ण दिवसभर कार्यक्रम दर्शनासाठी सुरू ठेवण्यात येतो.



