जामखेड रोटरी क्लबतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

जामखेड रोटरी क्लबतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
जामखेड प्रतिनिधी: जामखेड येथील रोटरी क्लब ऑफ,शाखा जामखेड यांच्या वतीने दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी रोटरी क्लब ऑफ जामखेड शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत गायकवाड, उपाध्यक्ष अरुण उगले, कोषाध्यक्ष डॉ.सादेख पठाण सदस्य डाॅ.भरत देवकर,डॉ.विकी दळवी,डॉ.आबेद जमादार,प्रा.संभाजी मुळे,प्रफुल सोळंकी आदी पदाधिकारी तसेच युवा उद्योजक आदर्श डोंगरे उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी पाडळी येथील माजी सरपंच विजय पवार व श्री नागेश विद्यालय येथील एन.सी.सी.विभागाचे शिक्षक मयूर भोसले यांची रोटरी क्लबच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.यावेळी त्यांचा शाल, गुलाब पुष्प देऊन सत्कार करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करण्यात आला व समाजहिताच्या उपक्रमांना चालना देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.



