छत्रपती शिवरायांसारखे विचार प्रत्येकाचे असेल तर समाजसुधारणा होईल – प्रा. मधुकर राळेभात

छत्रपती शिवरायांसारखे विचार प्रत्येकाचे असेल तर समाजसुधारणा होईल – प्रा. मधुकर राळेभात
जामखेड येथे शिवजयंती उत्साहात साजरी
जामखेड प्रतिनिधी: छत्रपती शिवरायांसारखे विचार प्रत्येकाचे असेल तर समाजसुधारणा नक्कीच होईल असे प्रतिपादन जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी केले.
शहरातील शिवाजीनगर भागातील आर.एन.ज्वेलर्स शेजारी प्रा.मधुकर (आबा) राळेभात मित्र परिवाराच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमासाठी जामखेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष पोपट राळेभात,वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा नगरसेवक ॲड.डाॅ.अरुण जाधव, प्रहार चे जयसिंग उगले, गटनेते तथा नगरसेवक तात्याराम पोकळे,नगर परिषदेचे बांधकाम समिती सभापती मोहन पवार,भाजपा शहर मंडलअध्यक्ष तथा नगरसेवक संजय काशिद, प्राचार्य तथा नगरसेवक विकी घायतडक,पिंटूशेठ बोरा,प्रा.संजय समुद्र,लक्ष्मण ढेपे,रमेश अडसूळ, कांबळे सर,गुलाब जांभळे,कॅप्टन लक्ष्मण भोरे,अरुण चिंचकर,प्रा.जाकीर शेख, जुबेर शेख,प्रविण होळकर,डाॅ.अशोक बांगर, शिक्षक नेते राम निकम,मोईन शेख, सुभाष थोरात, मच्छिंद्र जाधव,नवनाथ बहीर,ॲड.विशाल बारवकर आदी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ॲड. जाधव म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे संतांच्या विचारांप्रती अत्यंत आदर बाळगणारे होते.ते संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांच्या कीर्तनस्थळी जाऊन त्यातून प्रेरणा घेत असत.त्याचप्रमाणे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनीही शिवरायांच्या स्वाभिमान, सामाजिक न्याय आणि समानतेच्या विचारांनी प्रेरित होऊन तो वैचारिक वारसा पुढे चालू ठेवला.शिवरायांचा विचार हा केवळ स्वराज्यापुरता मर्यादित नसून सामाजिक परिवर्तन आणि समतेचा दीपस्तंभ असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी उपनगराध्यक्ष पोपट राळेभात,प्राचार्य तथा नगरसेवक विकी घायतडक, गुलाब जांभळे,प्रा.जाकीर शेख,प्रा.लक्ष्मण ढेपे, जुबेर शेख, कॅप्टन लक्ष्मण भोरे आदींची भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक दिगंबर चव्हाण, अमित जाधव,सुधीर पवार,सुरज राळेभात, ॲड.अमृत राळेभात, नागार्जुन राळेभात, महेश आजबे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नगरसेवक पवन राळेभात यांनी केले तर आभारप्रदर्शन अमित जाधव यांनी मानले.



