संपादकीय

” ठाकरे सरकारच्या गंभीर चुकांमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले”

 

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शीतयुद्ध पेटलेले दिसून येत आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र पाटील यांनी महाविकास आघडी सरकारवर अनेक गंभीर आरोप लगावले आहेत.

ठाकरे सरकारने गंभीर चुका केल्यामुळे आणि सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले. या सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्वप्रथम मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि नंतर ते रद्द केले. त्यानंतर ठाकरे सरकारने मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केलेले नाहीत. महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले असून त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

पाटील म्हणाले, सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकेसाठी पाठपुरावा केलेला नाही किंवा न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारशींनुसार पावले टाकलेली नाहीत. हे सरकार मराठा आरक्षण हा विषयच विसरून गेल्यासारखी स्थिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असेच या सरकारचे धोरण दिसते अशी टीका सुद्धा त्यांनी केली होती.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, ”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा युती सरकारने २०१८ साली कायदा करून मराठा समाजाला सरकारी नोकरी व शिक्षणात आरक्षण दिले. त्यामुळे मराठा समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकविले. हे सरकार असेपर्यंत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती आली नव्हती.

तथापि, ठाकरे सरकारला मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षणही टिकविता आले नाही. ठाकरे सरकारने योग्य बचाव केला नसल्यामुळे गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळला गेला. मराठा समाज मागास आहे, हे आता नव्याने सिद्ध करावे लागेल व तसे करताना सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तरे द्यावी लागतील असे त्यांनी यावेळी सांगितले.”

 

Back to top button