संपादकीय

“रझा अकादमी कोणाचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहित आहे – देवेंद्र फडणवीस

 

त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, मालेगाव व नांदेडमध्ये मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांनंतर राज्यात अमरावती आणि मालेगाववमध्ये अनेक हिंसक घटना घडल्या. विविध सरकारी अधिकाऱ्यांना व कार्यालयांना निवेदने देऊनही या मोर्चांना कालांतराने हिंसक वळण मिळालं. त्यानंतर भाजपने अमरावतीमध्ये बंद पुकारला. या बंद दरम्यान काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली.

अमरावतीमध्ये ज्या ठिकाणी मोर्चांना हिंसक वळण लागले त्या भागांना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली होत. तसेच यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका सुद्धा केली होती.

ते म्हणाले, यापूर्वीदेखील अशीच हिंसा मुंबईमध्ये झाली होती. पोलिसांना मारण्याचे काम रझा अकादमीमध्येच का होते?, तेव्हाही काँग्रेसचेच सरकार होते. रझा अकादमी काँग्रेसच्या काळातच हल्ला का करते? आशिष शेलारांचे फोटो तुम्ही दाखवले पण उद्धव ठाकरेंचे दाखवले का?, काँग्रेसच्या नेत्यांचे दाखवले का? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

रझा अकादमी कोणाचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहित आहे. जर कोणाला वाटत असेल रझा अकादमी भाजपची बी टीम आहे, तर त्यावर बंदी घालण्याची मागणी मी करतो, असंही फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Back to top button