संपादकीय

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून भाजपत गेलेले नेते स्वगृही परतण्याच्या तयारीत

 

मुंबई | २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सेनेने भाजपाला दूर सारून राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर घाब करून महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन केले होते. त्यानंतर भाजपाला घरघर लागली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोठे विधान केले आहे.

मलिक म्हणाले की, लवकरच भाजपमध्ये असणारे अनेक आमदार आता पुन्हा स्वगृही परतणार आहेत. भाजप हताश आहे. एनसीपी, काँग्रेसमधून भाजपमध्ये जे गेले होते ते आता घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. मलिक यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे.मलिक माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

तसेच सरकार पडण्याच्या नारायण राणे यांच्या विधाचा समाचार घेताना मलिक म्हणाले की, १९९९ मध्ये मुख्यमंत्रिपद गेलं आणि त्या पदासाठीच ते काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर भाजपत आले. त्यानंतर ते प्रत्येक वर्षी नवस करत आहेत. बोकड, कोंबड्या कापण्याचा प्रकार ते करत आहेत परंतु अजूनही नवस पूर्ण झालेला नाही असा टोला त्यांनी लगावला होता.

Back to top button