संपादकीय

आई कुठे काय करते ‘च्या या प्रसिद्धअभिनेत्याने सोडली मालिका?

 

मुंबई | ‘आई कुठे काय करते’ या मालिका अल्पावधीचखूप प्रसिद्ध झाली असून प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. टीआरपीच्या रेसमध्ये देखील ही मालिका अव्वल राहिली आहे. तसेच मुख्य पात्रांसह सहकलाकार देखील प्रेक्षकांना आवडतात. या मालिकेत देशमुख कुटुंबाच्या जावयाची भूमिका साकारणारा अभिनेता आशिष कुलकर्णी याने मालिका सोडल्याची चर्चा आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांसाठी आवडीचे आहे.

आता या मालिकेत केदारची भूमिका साकारणारा आशिष कुलकर्णी याने मालिका सोडल्याचे वृत्त समोर आहे. या मालिकेतून घराघरात पोहोचलेला केदार अर्थात आशिष कुलकर्णी मालिका सोडतोय, हे वृत्त ऐकल्यावर चाहत्यांचीही नाराजी पाहायला मिळतेय. दरम्यान तो एका नवीन मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचीही चर्चा आहे. सोनी मराठीवर तुमची मुलगी काय करते?

ही नवी मालिका येते आहे. नुकताच या मालिकेचा ट्रेलरही समोर आला आहे. या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत आशिष दिसणार असून त्यामुळेच आई कुठे काय करते ही मालिका सोडल्याची चर्चा आहे. लोकमतने याविषयी वृत्त दिले आहे. आशिष कुलकर्णीकडून याबाबत अद्याप कोणतंही स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. पण आशिषनंतर केदारच्या भूमिकेत कोण दिसणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

Back to top button