बीड

तपनेश्वर शाळेत कुसुमाग्रज वाचन अभियान

तपनेश्वर शाळेत कुसुमाग्रज वाचन अभियान

जामखेड, प्रतिनिधी : शहरातील तपनेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी कुसुमाग्रज वाचन अभियान उत्साहात पार पडले. वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित उपक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक ॲड.डॉ.अरुण जाधव, नगरसेवक मोहन पवार, ग्रामीण विकास केंद्राच्या सचिव उमाताई जाधव,आम आदमी पार्टीचे नेते बजरंग सरडे, युवा नेते प्रवीण होळकर आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रंथपूजनानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अवांतर वाचन करून उपक्रमात सहभाग नोंदविला. शाळेच्या वतीने उपस्थितांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक प्रताप पवार,संजय आरेकर,उपाध्यापिका जयश्री पाटील, मंगल सोलंकर,शितल कदम, रूपाली कांबळे, कल्पना मोरे, स्वाती गोरे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Back to top button