📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जामखेडमध्ये ‘राज रिसॉर्ट & लक्झुरियम लॉज पार्टी लॉन्स’चे उद्घाटन

जामखेडमध्ये ‘राज रिसॉर्ट & लक्झुरियम लॉज पार्टी लॉन्स’चे उद्घाटन

जामखेड प्रतिनिधी:

जामखेड शहरातील युवा उद्योजक युवराज रामचंद्र पोकळे यांचे ‘राज सॉर्ट & लक्झुरियम लॉज पार्टी लॉन्स’ या अत्याधुनिक व आकर्षक सुविधांनी सुसज्ज वास्तूचे भव्य उद्घाटन दि. ३१ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.

युवराज पोकळे यांच्या मातोश्री श्रीमती आशाबाई रामचंद्र पोकळे यांच्या हस्ते फित कापून या नवीन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी युवराज पोकळे यांच्या सौभाग्यवती अपर्णा पोकळे, भगिनी सौ.प्रा.प्रमिला शेटे,सौ.निर्मला नऱ्हे,प्रा. संभाजी शेटे, राहुल नऱ्हे, खंडू सगळे,पांडू सगळे, बाळासाहेब डुचे तसेच पोकळे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमासाठी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, उद्योगपती संजय हजारे,अजय कोठारी,नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, भाजपा गटनेते तात्याराम पोकळे, शहर मंडल अध्यक्ष तथा नगरसेवक संजय काशिद, अमित चिंतामणी, शिवसेनेचे युवा नेते आकाश बाफना,राजेंद्र कोठारी, नगरसेवक ॲड.प्रवीण सानप, नगरसेवक पवन राळेभात,माजी नगरसेवक दिगंबर चव्हाण,आर्किटेक्चर इंजि.मौसम गुंदेचा, मनोज कुलकर्णी, संजय कोठारी, पांडुरंग भोसले तसेच युवा नेते प्रवीण उगले,सचिन मोकाशे,अभिजित उगलमुगले, विनय डूकरे, राम राळेभात यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोकळे यांनी शून्यातून विश्व निर्माण करून व्यवसाय क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे. त्यांनी परिसरातील नागरिकांची गरज ओळखून भव्य, दिव्य सुविधांनी युक्त ‘राज रिसॉर्ट लक्झुरियम लॉज पार्टी लॉन्स’ जामखेडकरांच्या सेवेत सुरू केले असून नागरिकांना आता अहिल्यानगर, पुणे येथे जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. पुणे व अहिल्यानगर येथील नागरिकांनाही जामखेडमध्ये या प्रकल्पामुळे उत्कृष्ट सुविधा मिळणार असून, या नव्या रिसॉर्टमुळे जामखेड शहराच्या वैभवात भर पडली आहे.

राज रिसॉर्ट & लक्झुरियम लॉज पार्टी लॉन्स’ हे केवळ एक लॉज किंवा पार्टी लॉन नसून विविध लग्न समारंभ, वाढदिवस, साखरपुडा, कौटुंबिक कार्यक्रम, सामाजिक समारंभ व कॉर्पोरेट इव्हेंट्ससाठी अत्यंत उपयुक्त असे आधुनिक ठिकाण ठरणार आहे. या वास्तूमध्ये प्रशस्त पार्टी लॉन, आकर्षक सजावट, निवासासाठी आरामदायी खोल्या, वाहन पार्किंग, उत्कृष्ट सेवा सुविधा आणि आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाबळेश्वर, अहिल्यानगर, पुणे येथील सुविधा जामखेड शहरात उपलब्ध करून दिल्याने या ठिकाणाला मोठी पसंती मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन युवराज पोकळे यांनी मानले.

*साधेपणातून साकारलेलं ‘राज’चं वैभव…*

पत्र्याच्या छोट्याशा शेडपासून सुरू झालेल्या व्यवसायातून युवराज पोकळे यांनी अल्पावधीतच ‘राज उद्योग समूह’ उभा करत गगनभरारी घेतली. वयाच्या १६व्या वर्षी सुरू केलेल्या या प्रवासात आज राज कॉम्प्लेक्स, लॉन्स, मंगल कार्यालय, रिसॉर्ट व इतर व्यवसाय उभे राहत जामखेडमध्ये नावलौकिक मिळवला आहे. दर्जेदार सुविधा आणि लोकांच्या विश्वासामुळे ‘राज उद्योग’ हा कार्यक्रमांसाठी पहिली पसंती ठरत आहे. भविष्यात ‘राज पॅलेस’ उभारण्याचा मानस व्यक्त करत युवराज पोकळे यांनी जामखेडकरांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Back to top button