मुंबई

मुंबई महापालिकेच्या ८२ हजार कोटींच्या ठेवी अभासी, काँग्रेसचा दावा

 

राज्यात मुंबई महानगर पालिकेचा अव्हघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेसने सर्व जागा लढवण्याची जाहीर करून सत्तेत असलेल्या मित्रपक्षाला तसेच मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला धक्का दिला आहे. त्यातच मुंबई मनपाचे विरोधी पक्षनेते रवी राजा मुंबई मानपावर गंभीर आरोप लगावले आहे.

मानपामध्ये ८२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचं सांगितलं जातं. पण या ठेवी केवळ अभासी आहेत. प्रत्यक्षात महापालिकेच्या तिजोरी खाली असल्याचा दावा मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे नेते रवी राजा यांनी केला आहे. मुंबईकरांच्या नागरी कामाच्या फाईल्स निधी अभावी पडून असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

यंदा ९ हजार कोटीच्या ठेवी जमा झाल्या. पण महापालिकेनं ५ हजार कोटी रुपयांचा वापर इतर कामासाठी केल्यानं यंदा प्रत्यक्षात ३ हजार कोटींच्याच ठेवी ठेवण्यात आल्या. त्यामुळे यंदा महापालिकेच्या मुदत ठेवीची रक्कम वाढली नसल्याचं रवी राजा यांनी म्हटलंय. महापालिका आता ८२ हजार कोटींच्या ठेवी असल्याचं सांगत आहे. पण प्रत्यक्षांत यातील ५० हजार कोटीच्या ठेवी या कर्मचारी निधी आणि मोठ्या प्रकल्पांच्या ठेवी आहे. त्यामुळे केवळ ३० हजार कोटी रुपये महापालिका वापरु शकते त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजुक बनत चालल्याचंही रवी राजा यांनी म्हटलं आहे.

Back to top button