📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

पाडळी येथील सनराईज शैक्षणिक संकुलात विठ्ठल नामाची शाळा ! नयनरम्य रिंगण सोहळा

पाडळी येथील सनराईज शैक्षणिक संकुलात विठ्ठल नामाची शाळा ! नयनरम्य रिंगण सोहळा

जामखेड प्रतिनिधी – महाराष्ट्र ही एक संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषाने दुमदुमलेल्या पाडळी मधील पवित्र भूमीतील आज दि. ५ जुलै २०२५ रोजी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले जामखेड तालुक्यातील पाडळी येथील सनराईज मेडिकल & एज्युकेशन फौडेंशनचे स्व.एम.ई भोरे जुनिअर कॉलेज,साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय, सनराईज् इंग्लिश स्कूल ,स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील सर्व शाखेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी एकत्र येत आषाढी एकादशीचे औचित्य साधून दिंडी सोहळा पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी नयनरम्य रिंगण करून पारंपरिक वेशभूषा परिधान करून दिंडी सोहळ्यात मोठ्या उत्साहात सहभागी झाले. हरिनामाचा गजर करत टाळ, मृदंगाच्या तालावर ठेका धरत “विठ्ठल नामाचा’ जयघोष करत दिंडीने सनराईज् शैक्षणिक संकुलाच्या प्रारंगणातून सुरू होऊन पाडळी येथील विठ्ठल रखुमाई मंदिर येथे पोहचली.
यावेळी विद्यार्थी, शिक्षक यांनी फुगडीचा खेळून आनंद घेतला. सनराईज इंग्लिश स्कूल मधील चिमुकल्यांनी विठ्ठल- रखुमाई चे वेशभूषा परिधान करून आलेले विद्यार्थ्यांचे ,पालकांचे प्रमुख आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी पालखी तयार करून त्यामध्ये प्रत्यक्ष पंढरपुरातील विठू माऊली चे दर्शन घडवले.
यावेळी सनराईज शैक्षणिक संकुलाच्या सचिव तथा प्राचार्या सौ. अस्मिता जोगदंड / भोरे यांनी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करत राज्यात समाधानकारक पाऊस पडून शेतकरी बांधव सुखी होवोत, दुष्काळ दूर जावो, अशी भावना व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक प्रा.तेजस भोरे,
प्रा.विनोद बहिर, प्रा.प्रदीप भोंडवे, प्रा.दादासाहेब मोहिते,प्रा. छबिलाल गावित,मुख्याध्यापक विजय मनेरे, सुनील पठाडे, सविता काळे, साधना दंडवते,हनुमंत पाटील, रामभाऊ टिळेकर, आण्णा महानवर, चंद्रकांत सातपुते,सुषमा भोरे ,महेश पाटील, दिनकर सरगर, हनुमंत वाघमारे, बुवासाहेब दहीकर, बिभीषण भोरे,अमर भैसडे, सानिया सय्यद,भाऊसाहेब भोईटे ,अंजली कात्रजकर, प्रियंका भैसडे, सिमा भवाळ,अर्चना मोहळकर,कांचन पवार, दिपक दहीकर आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सुनील घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन सौ.स्वाती पवार यांनी मानले. जामखेड तालुका शिक्षण संस्था तथा सनराईज् शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांनी शैक्षणिक संकुलामध्ये होणारे विविध उपक्रम, शिक्षकांच्या मेहनती बद्दल कौतुक केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Back to top button