रत्नागिरी
मंडणगड तालुक्यातील बंद असलेल्या सीएनजी पंप बाबत तहसीलदार यांना निवेदन

मंडणगड तालुक्यातील बंद असलेल्या सीएनजी पंप बाबत तहसीलदार यांना निवेदन
मंडणगड प्रतिनिधी
मंडणगड तालुक्यातील एकमेव असे सीएनजी पंप गेले पंधरा ते अधिक दिवस बंद स्थितीत असल्याने येथील रिक्षा चालक ,खासगी वाहने व ट्रावेलिंग एजेन्सी यांचा उदरनिर्वाह याच सीएनजी पंपात होत असल्याचे व्यापार, व्यवसायात मोठा आर्थिक फटका बसला असल्याने याचा नागरिकांना नाहक त्रास सोसवा लागत आहे.यामुळे आखील भारतीय छावा संघटना रत्नागिरी व मंडणगड ग्रामस्थांनी मंडणगड तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन तात्काळ सीएनजी पंप सुरू करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले. यावेळी आमीर जोगीलकर,नागेश गोरे ,शिवम दळवी,व महेंद्र सावंत आदी उपस्थित होते.



