आळंदी नगर परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण, श्री राजेश कराळे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

आळंदी नगर परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण, श्री राजेश कराळे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पुणे/आळंदी:-आळंदी नगर परिषदेच्या वतीने प्रथमच आदर्श शिक्षक पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करणे, त्यांना प्रेरणा देणे ,शिक्षकांची गुणवत्ता वाढवणे ,त्यातून विद्यार्थी हित साधने, समाजात शिक्षकांचा मान वाढवणे , नवीन प्रयोग व कल्पना प्रोत्साहित करणे, शिक्षण क्षेत्रातील आदर्श निर्माण करणे हे *उद्देश डोळ्यासमोर ठेवून* आळंदी नगरपरिषद मार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे. ०२ मे रोजी आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आलेले होते. 2025 या वर्षीचा प्रथम पुरस्कार श्री राजेश बाळासाहेब कराळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम दहा हजार रुपये प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. *आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यासाठी खालील घटक विचारात घेण्यात आले.*
शिक्षकांची सलग सेवा, वर्षभरात घेतलेले प्रशिक्षण, शिक्षकांची दैनंदिन उपस्थिती , शालेय विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण शालेय विविध उपक्रम, शैक्षणिक क्षेत्रात संशोधन प्रबंध, शिक्षकांनी शाळेच्या उन्नतीसाठी केलेले विशेष प्रयत्न, शिक्षकांमार्फत आयोजित करण्यात आलेले विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा, शिक्षण साहित्य निर्मिती, मागील पाच वर्षाची गोपनीय अहवाल, शिक्षकांचे चारित्र्य व सचोटी, शिक्षकांकडून शिक्षण पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शिस्त नैतिकता व सामाजिक बांधिलकी.
*शाळांच्या ग्रंथालयाकरिता 670 पुस्तके देण्यात आली*.
आळंदी नगर परिषदेच्या वतीने शाळा क्रमांक एक ते चार शाळेमध्ये विद्यार्थ्यांकरीता ग्रंथालय तयार करण्यात यावे याकरिता 670 पुस्तके चार शाळांमध्ये विभागून देण्यात आली आहे याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण करणे हा आहे. विद्यार्थ्यांच्या वाचन आवडी बरोबरच शिक्षकांच्या साठी वाचन योग्य पुस्तके ही यामध्ये देण्यात आलेली आहेत.
*सदर कार्यक्रमात श्री जनार्दन पारवे यांना अनुकंपा नियुक्ती देण्यात आली.*
विष्णू केरबा पारवे यांचे नातू जनार्दन ज्ञानेश्वर पारवे
विष्णू केरबा पारवे सेवानिवृत्त कर्मचारी दिनांक सहा जानेवारी 2021 रोजी सेवानिवृत्त झाले होते, प्रकरण चार वर्षे पेंडिंग होते
*नगर परिषदेच्या पदोन्नती मिळाल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान.*
आळंदी नगर परिषदेच्या कर विभागातील श्री भैरवनाथ काळे व श्रीमती मयुरी पाटील यांना पदोन्नती मिळाली आहे त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
१५ ऑगस्ट निमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, त्यात प्राविण्य मिळविलेल्या २० विद्यार्थ्यांना प्रशस्ती गौरविण्यात आले.
. श्रीमती सोनकुसरे मॅडम प्रशासन अधिकारी आळंदी नगरपरिषद शाळा यांनी प्रास्ताविक केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भैरट सर व मुख्याध्यापिका सुनीता तापकीर मॅडम यांनी केले.
कार्यक्रमास पुढील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी *मा. श्री. डी.डी.भासले पाटील, मा. श्री. संजय घुंडरे, मा. श्री. प्रशांत कु-हाडे, मा. श्री. सचिन गिलबिले, मा. श्री. दिनेश घुले, मा. श्री. सागर भोसले, मा. श्री. अशोकराव उमरगेकर, मा. श्रीमती शैला तापकीर, मा. श्री विनोद कांबळे, मा. श्री. सचिन काळे, मा. श्री. संदेश तापकीर, मा. श्री. राहुल चव्हाण, मा. श्री. आदित्य घुंडरे, मा. श्री. आकाश जोशी, मा. श्री. पांडुरंग वहिले* *मा.श्री. अनिल घुंंडरे* *मा.श्री अनिल वाघमारे* तसेच नगरपरिषदेच्या *कार्यालय अधिक्षक श्रीमती अर्चना भिसे* व सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षण विभागाकडील प्रशासन अधिकारी मा. श्रीमती व्ही. एस. सुनकुसळे, नगरपरिषद शाळा क्र. १ ते ४ चे मुख्याधापक, शिक्षक व शिक्षीका तसेच शहरातील सर्व पत्रकार इ. उपस्थित होते. तसेच नगरपरिषदेचे अधिकारी *श्री प्रदिप आवारी* यांनी कार्यक्रमाची सांगता करुन उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे घोषीत केले.
(माधव खांडेकर)
मुख्याधिकारी
आळंदी नगरपरिषद, आळंदी



