महाराष्ट्र

दिवाळीनंतर आर्यन खान ‘मन्नत’ पासून दूर राहणार खान दाम्पत्याचा निर्णय

 

मुंबई | अभिनेता शाहरूख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात २६ दिवस आर्थर रोड जेलमध्ये होता. संपूर्ण बंगल्यावर रोषणाई करून त्याचे स्वागत केले होते. सध्या आर्यन खान आता जामीनावर सुटला असून तो मन्नतवर आहे. यानंतर शाहरूख खान आणि गौरी खान आपल्या मुलासाठी खूप मोठा निर्णय घेणार आहेत, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

आर्यन खानला ड्रग्स प्रकरणावर जामीन मंजूर झाला. त्यानंतर तो कारागृहातून बाहेर आला. मात्र आता तो मुंबई बाहेर जाऊ शकत नाही. आर्यन खानला पासपोर्ट न्यायालयात जमा करायचं आहे. असं असलं तरी आर्यन खानला दिवाळीनंतर ‘मन्नत’ पासून दूर जायचं आहे. आर्यन काही दिवस अलिबागच्या फार्म हाऊसमध्ये राहणार आहे. शाहरूखला असं वाटतंय की, आर्यन काही दिवस या सगळ्यापासून लांब राहावा. जेणे करून त्याची मानसिक स्थिती सुधारेल.

शाहरुख खान आणि मित्रांना आर्यन जामिनावर बाहेर येईपर्यंत मन्नतला भेट न देण्याची विनंती केली होते. आणि आता त्यांनी मन्नतचे दरवाजे सर्वांसाठी पुन्हा उघडले आहेत. ‘मन्नत’मध्ये आता उत्सवाची वेळ आली आहे. या दरम्यान सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खान दांपत्य आर्यनला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि प्रसार माध्यमांपासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत आहेत.

Back to top button