बीड

उपविभागीय अभियंता राजेंद्र भोपळें कंत्राटदाराची वकीली करू लागले म्हणे कंत्राटदाराने स्वखर्चाने खड्डे बुजवले ; निकृष्ट दर्जाच्या रस्त्याप्रकरणी चौकशीस टाळाटाळ :-  डॉ. गणेश ढवळे

उपविभागीय अभियंता राजेंद्र भोपळें कंत्राटदाराची वकीली करू लागले म्हणे कंत्राटदाराने स्वखर्चाने खड्डे बुजवले ; निकृष्ट दर्जाच्या रस्त्याप्रकरणी चौकशीस टाळाटाळ :-  डॉ. गणेश ढवळे
—-
बीड (दि. १४) – जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ४ महिन्यांत उखडलेल्या नगररोडच्या रस्त्यावर खड्डे पडल्याने कामाच्या निकृष्ट गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी जिल्हाधिकारी व महामार्ग प्राधिकरणाकडे सखोल चौकशी व कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला.
मात्र चौकशीऐवजी उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभागाचे राजेंद्र भोपळे यांनी कंत्राटदाराच्या बाजूने उभे राहत — “आथॉरिटी इंजिनिअरच्या निर्देशानुसार कंत्राटदाराने स्वखर्चाने क्राँक्रीट पॅनेल बदलून खड्डे बुजवले” असा लेखी खुलासा दिला. स्थानिकांनी याला “कंत्राटदाराची वकीली” म्हणून हिणवले आहे.
निकृष्ट काम झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न
शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या या रस्त्याचे काम पूर्ण होऊन अवघे चार महिने होत असतानाच तो खचू लागला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पडलेले खड्डे दुसऱ्याच दिवशी बुजवून निकृष्ट कामाचा ठपका झाकण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. यावर डॉ. ढवळे यांनी “चौकशीऐवजी पाठराखण” केल्याचा आरोप केला असून नागरिकांत तीव्र नाराजी आहे.
‘यु-टर्न’ मागणीवर नियमांचा बुरखा
सदर रस्त्यावर १ किमीच्या परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालय, तहसील, पंचायत समिती यांसह २५ हून अधिक शासकीय कार्यालये आहेत. वाहनांना थेट वळण मिळावे म्हणून ‘यु-टर्न’ची मागणी केली असता भोपळे यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या आयआरसी नियमांचा हवाला देत नकार दिला.
स्थानिकांच्या मते, “इतर ठिकाणी हेच नियम पायदळी तुडवले जातात, पण येथेच कडक अंमलबजावणी दाखवली जाते”, असा आरोप आहे.
फोटो ओळ
“चार महिन्यातच खचला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता!”
“चौकशीऐवजी कंत्राटदाराला वाचवण्याचा प्रयत्न”
Back to top button