📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा संकल्प

प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा संकल्प

जामखेडमध्ये ११ ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य व रक्तदान शिबीर

जामखेड :माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा समिती, जामखेड यांच्या वतीने सोमवार, दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता महावीर मंगल कार्यालय, नगर रोड, जामखेड येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात हृदयरोग व मधुमेह तपासणी, ईसीजी, रक्तदाब व साखर तपासणी, मोतीबिंदू व नेत्ररोग तपासणी, तसेच कान, नाक, घसा तपासणी अशा विविध वैद्यकीय सेवा मोफत दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक रक्तदात्यास ट्रॅक सूट किंवा पाण्याचा जार भेट दिला जाणार आहे.तसेच महावीर भवन या ठिकाणी सायंकाळी ७.०० वाजता अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचे माहिती अभिष्टचिंतन सोहळा समिती चे आयोजक तथा नगरसेवक अमित जाधव यांनी दैनिक सुर्योदय न्यूज शी बोलताना दिली.

शिबिराचे उद्‌घाटन सौ. रोहिणीताई सचिन घुले पाटील (नगराध्यक्ष, कर्जत नगरपंचायत) यांच्या हस्ते होणार असून, पै. शरद कार्ले (सभापती, कृ.उ.बा.स., जामखेड), मा. संतोष म्हेत्रे (उपनगराध्यक्ष, कर्जत), मा. अजय साळवे (मुख्याधिकारी, जामखेड न.प.), मा. दशरथ चौधरी (पोलीस निरीक्षक, जामखेड) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शिबिरासाठी मार्गदर्शक तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये :- डॉ. प्रशांत जाधव (हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ),डॉ. सुशील पन्हाळकर (अस्थिरोग तज्ज्ञ),डॉ. शिवानी पन्हाळकर (कान, नाक, घसा तज्ज्ञ),डॉ.सौ.विद्या तोंडे (नेत्ररोग तज्ज्ञ),डॉ. भरत दारकुंडे (ICU Intensivist, समर्थ हॉस्पिटल) यांचा समावेश आहे.

या उपक्रमातून गरजू रुग्णांना आरोग्य तपासणीसाठी मोठा आधार मिळणार असून, समाजसेवेत सदैव अग्रेसर असलेल्या मधुकर (आबा)राळेभात यांच्या कार्याचा हा उपक्रम एक प्रेरणादायी ठरणार आहे.

Back to top button