बीड
युरोपमध्ये होणाऱ्या कुडो वर्ल्ड कप स्पर्धेकरिता सुर्डीच्या सौरभ जाधवची निवड

युरोपमध्ये होणाऱ्या कुडो वर्ल्ड कप स्पर्धेकरिता सुर्डीच्या सौरभ जाधवची निवड
आ. विजयसिंह पंडित यांनी सत्कार करुन दिल्या शुभेच्छा
गेवराई दि.२३( प्रतिनिधी);- युरोपमध्ये होणाऱ्या कुडो वर्ल्डकप स्पर्धेसाठी गेवराई विधानसभा मतदारसंघातील सुर्डीच्या सौरभ जाधव यांची निवड झाली असून आ. विजयसिंह पंडित यांनी सौरभचा जाहीर सत्कार करून स्पर्धेसाठी जाणाऱ्या सौरभ जाधवचा गेवराई विधानसभा मतदार संघाला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया विजयसिंह पंडित यांनी यावेळी दिली.
युरोपमध्ये होणाऱ्या कुडो वर्ल्ड कप स्पर्धेसाठी शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी ॲथलेटीका फिटनेस, सूरत येथे वर्ल्ड कप निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते, त्यात भारतातील एकूण २६ राज्यातील कुडो राष्ट्रीय विजेत्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात बीड जिल्ह्यामधून महाराष्ट्र राज्यामार्फत गेवराई विधानसभा मतदारसंघातील मोजै सुर्डी येथील सौरभ जाधवची निवड करण्यात आली. युरोप येथे जून २०२५ मधे होणाऱ्या कुडो वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सौरभची निवड झाली असून राष्ट्रीय कोच
हांशी मेहुल वोरा यांच्या मार्गदर्शनाखा भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी युरोप येथे टीम इंडिया जाणार आहे. सोरभला प्रशिक्षक अरविंद मोरे, ज्ञानेश्वर गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
सौरभ जाधवची निवड झाल्याबद्दल आ. विजयसिंह पंडित यांनी त्यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या क्रीडा क्षेत्रात चांगले वातावरण तयार होत सौरभ जाधवची निवड मतदारसंघासाठी अभिमानास्पद आहे असेही विजयसिंह पंडित यावेळी बोलताना म्हणाले. याप्रसंगी सुर्डीचे सरपंच महादेव सोळुंके, राम कुलकर्णी, अर्जुन कुलकर्णी, यश अतकरे, गणेश सुर्डीकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



