बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने अॅड. गोविंद शिराळे पाटील यांचा भव्य सत्कार

बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने अॅड. गोविंद शिराळे पाटील यांचा भव्य सत्कार
बीड (प्रतिनिधी): महाराष्ट्रात लौकिक असलेल्या बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने नगरपरिषद बीड येथे स्वीकृत सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल अॅड. गोविंद शिराळे यांचा भव्यदिव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सदर नियुक्ती ही कायदेविषयक पार्श्वभूमी, विधी विद्यापीठातून प्राप्त पदवी तसेच दहा वर्षे सहा महिन्यांच्या प्रदीर्घ वकिली अनुभवाच्या आधारे तसेच गेली तेरा वर्ष भाजपाच्या सक्रिय सदस्य म्हणून तसेच गेल्या वीस वर्षापासून वडीलांच्या खांद्याला खांदा देवून सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम केल्यामुळे भाजपच्या पक्ष नेतृत्वाने आदरणीय आमच्या नेत्या नामदार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे साहेब, भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष शंकरभाऊ देशमुख, माझे सर्वस्व दैवत माझे आदरणीय वडील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ (अण्णा)शिराळे, बीड विधानसभा युवा नेते डॉ.योगेशभैय्या क्षीरसागर, बीड नगरपरिषद गटनेत्या डॉ.सारिकाताई क्षीरसागर, राज्य कार्यकारिणी सदस्य अॅड.सर्जेराव (तात्या) तांदळे, बीड शहर अध्यक्ष अशोक लोढा, नागरगोजे सर यांनी संधी दिल्याबद्दल हा क्षण अॅड. गोविंद शिराळे यांच्यासाठी अत्यंत अभिमानाचा व कौतुकाचा ठरला.
यावेळी बोलताना अॅड. गोविंद शिराळे यांनी सांगितले की, मी एक चांगला वकील व सक्षम अभिवक्ता म्हणून घडण्यासाठी माझ्या प्रॅक्टीस सुरुवात पुणे जिल्हा व सत्र न्यायालय व बीड जिल्हा वकील संघातील सर्व ज्येष्ठ वकील, सहकारी, सीनियर व ज्युनियर वकिलांचे मार्गदर्शन, त्यांचे अमूल्य सल्ले व सहकार्य अत्यंत मोलाचे ठरले आहे. माझी संपूर्ण जडणघडण ही पुणे आणि बीड वकील संघात झाली असून या संघाचा मी कायम कृतज्ञ राहील. या सत्कार समारंभास बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुभाष पिसुरे, उपाध्यक्ष अॅड.रघुराज देशमुख, सचिव अॅड. सुभाष काळे, कोषाध्यक्ष अॅड.योगेश टेकाडे, ग्रंथपाल सचिव अॅड.अजीम सय्यद तसेच वकील संघाचे सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अॅड. गोविंद शिराळे यांच्यासोबत उपस्थित सहकारी नगरसेवकांचाही सत्कार करण्यात आला. तसेच पुणे बार असोसिएशनच्या ज्येष्ठ विधिज्ञ, सहकारी मित्र मंडळी यांनी पुणे येथून भ्रमणध्वनी व सोशल मिडीया द्वारे शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. बीड जिल्हा वकील संघाच्या सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील योगदानाचे हे एक सकारात्मक उदाहरण असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.



