मुंबई

पवार साहेबांवर भाष्य करणाऱ्यांनी पहिली आपली लायकी बघावी

 

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी क्रुझ पार्टीवर केलेल्या छापेमारीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा कारवाई दरम्यान अटकेत आहे. यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरुन चांगलच शाब्दिक युद्ध पेटले आहे. या सर्व प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केल्याने एकच खळबळ उडाली.

या सर्व प्रकरणावरुन आता भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. व्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या दस्तुरखुद्द राष्ट्रीय अध्यक्षांचे तोंड कापावे लागलेय त्याच्या प्रवक्त्याकडून नशामुक्तीचे समर्थन कसे केले जाईल?, वो तो बस अपने ‘मालिक’ का धर्म निभा रहा है, असं म्हणत तुषार भोसले म्हणाले होते. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका सुरु होऊ लागल्या. यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी देखील तुषार भोसले यांना चांगलेच सुनावले आहे.

अमोल मिटकरींनी ट्विट करत लिहिले की, ‘छकडा’ शाळीग्राम आडनाव बदलून स्वतःचं नपुंसकत्व झाकु पाहतोय. पवार साहेबांवर तोंडसूख घेणाऱ्या आचाऱ्याने आपली औकात बघावी. “तुका म्हणे गाढव लेका | जिथे दिसेल तिथे ठोका ||” , असे म्हणत मिटकरींनी तुषार भोसले यांना कडक शब्दात सुनावले आहे.

 

Back to top button