📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
रत्नागिरी

जालगाव येथे भारतरत्न पां. वा.काणे यांना अभिवादन

जालगाव येथे भारतरत्न पां. वा.काणे यांना अभिवादन

दापोली :- महामहोपाध्याय भारतरत्न पां . वा.काणे यांची ०७ मे ही जयंती
*या निमित्त दापोली तालुक्यातील जालगाव येथील महामहोपाध्याय भारतरत्न पां . वा.काणे स्मारक या ठिकाणी भारतरत्न पां.वा.काणे यांना अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं* .
याप्रसंगी समितीचे अध्यक्ष प्रशांत परांजपे ,उपाध्यक्ष युयूत्सू आर्ते देवरुख , प्रा. उदय महाबळ सावर्डे , रंजना कदम देवरुख ,वैभवी सागवेकर दापोली आदी मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील पेढे परशुराम हे जन्मगाव असलेले , खेड तालुक्यातील मुरडे हे मूळ गाव आणि त्यानंतर दापोली शहरात वास्तव लाभलेले आणि भारतरत्न हा किताब प्राप्त झालेले पांडुरंग वामन काणे यांच्या स्मारकाचे नूतनीकरण कार्य हाती घेण्यात येत असून तमाम भारतीयांसह रत्नागिरी जिल्ह्यातील त्याचप्रमाणे दापोली तालुक्यातील नागरिकांनी खारीचा वाटा या स्मारकाच्या उभारणीकरिता द्यावा असे आवाहन स्मारक समितीचे प्रमुख प्रशांत परांजपे यांनी भारतरत्न पां.वा .काणे जयंतीच्या निमित्ताने केले आहे.

Back to top button