बीड

वैद्यकीय क्षेत्रात घवघवीत यश; पद्मश्लोक डरफे पाटील यांचे अभिनंदन

वैद्यकीय क्षेत्रात घवघवीत यश; पद्मश्लोक डरफे पाटील यांचे अभिनंदन
गेवराई प्रतिनिधी —
चिरंजीव पद्मश्लोक निता रामेश्वर डरफे पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठेची एम.बी.बी.एस. पदवी संपादन करून उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
              ज्ञानवंत, गुणवंत, प्रज्ञावंत आणि यशवंत व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या पद्मश्लोक यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या बळावर हे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे डरफे पाटील परिवारासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या यशाबद्दल आप्तेष्ट, मित्रपरिवार व विविध मान्यवरांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व शुभाशीर्वाद देण्यात येत आहेत.
Back to top button