📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

तलवारीने केक कापून सोशल मीडियावर दहशत पसरविणाऱ्यांना केज पोलिसांचा दणका!

तलवारीने केक कापून सोशल मीडियावर दहशत पसरविणाऱ्यांना केज पोलिसांचा दणका!
*हत्यारासह दोन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात*
==================================================
केज/प्रतिनिधी
केज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तलवारीनी केक कापून सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात दहशत पसरविणाऱ्यांना केज पोलिसांनी कायद्याचा दणका दिला असून हत्यारासह आरोपींना केज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
     याबाबतची सविस्तर माहिती अशी की, दिनांक ९ ऑक्टोंबर २०२६ रोजी ४-५० वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील नामेवाडी येथे काही तरुणांनी तलवारीने केक कापत असतानाचा व्हिडिओ बनवून सदरील व्हिडिओ हा इंस्टाग्राम अकाउंट आयडी क्रिश पांचाळ ३०२ या सोशल मीडिया अकाउंट वरून व्हायरल केल्याची  गोपनीय सूत्राकडून  माहिती केज पोलिसांना मिळाली. की दि.६ ऑक्टोंबर २०२६ रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बाळासाहेब देविदास अहंकारे यांनी १०-०० वाजण्याच्या सुमारास इंस्टाग्राम अकाउंट आयडी क्रिश पांचाळ ३०२ या आयडीवर रील पाहिली की, इसम नामे अजय अशोक तांदळे व एक अनोळखी इसम याचा वाढदिवस साजरा करताना दहशत माजविण्याच्या उद्देशाने तलवारीने केक कापला आहे.
तलवारीने केक कापत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. सदरची माहिती ही केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना देण्यात आली.
सदरील माहितीची खात्री करून तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी दिले.
दिनांक ९ ऑक्टोंबर २०२६ रोजी ज्या तलवारीने केक कापला आहे. ती तलवार इसम नावे सदाशिव नामदेव आंधळे रा. नामेवाडी ता. केज याच्या राहत्या घरी ठेवलेली आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी पोलीस पथकाने छापा मारून ४० इंच लांबीची तलवार,१० इंच लांबीचा खंजीर, ८ इंच लांबीचा खंजीर, असे हत्यारे जप्त करण्यात आले असून सदर आरोपी विरोधात केज पोलीस ठाणे येथे गु.र.नं.६४१/२०२६ कलम २५,४ शस्त्र अधिनियम सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ प्रमाणे कारवाई करण्यात आली असून सदरील गुन्ह्यात अजय अशोक तांदळे वय २६ वर्षे रा. कोरेगाव ता. केज, सदाशिव नामदेव आंधळे वय ३५ वर्षे रा. नामेवाडी ता. केज यांना अटक करण्यात आलेली आहे. तर क्रिश पांचाळ रा. बीड याला अटक करण्याचे बाकी आहे.
सदरील घटनेचा पुढील तपास हा पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाळासाहेब अहंकारे हे करत आहेत.
खबरदार यापुढे केज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोणी तलवारीने केक कापून दहशत पसरवुन वाढदिवस साजरा केल्यास त्या इस्माविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी दिला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम, पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार,पोह/बाळासाहेब अहंकारे,मपोह/कविता गायकवाड,पोअ/संतोष गीते,पोअ/शिवाजी कागदे,पोअ/नितीन वारे,पोअ/राहुल तरकसे,पोअ/दादाराव देवगुडे यांच्या डीबी पथकाने केली आहे.
Back to top button