बीड

प्रभाग क्र.७ मध्ये २३ जानेवारीला महिलांसाठी हळदी-कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

प्रभाग क्र.७ मध्ये २३ जानेवारीला महिलांसाठी हळदी-कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

नगरसेवक मोहन पवार व राजश्री पवार यांचा सामाजिक उपक्रम

जामखेड | प्रतिनिधी
नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक तथा सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती मोहन पवार व त्यांच्या सौभाग्यवती राजश्रीताई मोहन पवार यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सौभाग्यवती व माजी सभापती सौ. आशाताई राम शिंदे तसेच जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. प्रांजल चिंतामणी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
महिला भगिनींसाठी विशेष आकर्षण म्हणून सुमधुर गाण्यांचा आर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला असून, पारंपरिक हळदी-कुंकू व तिळगुळ वाटप करण्यात येणार आहे. सामाजिक ऐक्य जपणारा व सांस्कृतिक परंपरेचा वारसा जतन करणारा हा उपक्रम ठरणार असल्याने महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन सौ. राजश्रीताई मोहन पवार, सौ. शीतल पंडित पवार, सौ. कांताबाई दिलीप गायकवाड व सौ. अर्चना लहु पवार यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम श्री नागेश विद्यालयाच्या पाठीमागे, संतोषीमाता मंदिराजवळ, जामखेड येथे संपन्न होणार आहे.

Back to top button