बीड

“बालविवाह कुटुंब व्यवस्था उध्वस्त करणारी अनिष्ट प्रथा “- प्रा. डॉ. सय्यद शहानुर

“बालविवाह कुटुंब व्यवस्था उध्वस्त करणारी अनिष्ट प्रथा “- प्रा. डॉ. सय्यद शहानुर
पाटोदा दिनांक १८ जानेवारी रोजी, येथील नवगण शिक्षण संस्था राजुरी (न.) संचलित, वसंतदादा पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे चुंबळी येथे” युवा व शाश्वत विकास विशेष लक्ष पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन आणि पडीक जमीन विकास ” या उपक्रमानुसार राष्ट्रीय सेवा योजना सात दिवशीय  विशेष शिबीर मौजे चुंबळी ता. पाटोदा जि. बीड येथे सुरू आहे. या शिबिराच्या सहाव्या दिवसाच्या बौद्धिक सत्रामध्ये” लिंगभाव व बालविवाह समस्या या विषयावरील कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा येथील शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा. डॉ. शहानुर सय्यद यांचे व्याख्यान पार पडले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्यक्रम अधिकारी प्रा. गोकुळ कंठाळे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी  प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ पार पडल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सोमनाथ लांडगे यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थ्यांच्या श्रमाविषयी आणि वनराई बंधाऱ्याच्या नव निर्मिती विषयी पाहुण्यांना माहिती करून दिली. तसेच आजच्या व्याख्यानाचा विषय लिंगभाव व बालविवाह समस्या या विषयी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. त्या नंतर डॉ. सय्यद शहानुर यांचे व्याख्यान संपन्न झाले. आपल्या व्याख्यानात त्यांनी, ”  बालविवाह समस्या ही आपल्या संस्कृतीला लागलेली कीड आहे, यामुळे कुटुंबाचा विकास तर दूरच उलट कुटुंबाची अधोगती होण्यास या रुढी परंपरा कारणीभूत ठरतात, लिंगभेदामुळे स्त्री आणि पुरुष असा भेदभाव होऊन स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते, यामुळे कुटुंब व्यवस्थेत भावनिक दरी निर्माण होते म्हणून हा भेदभाव करू नये आणि कुटुंब व्यवस्था विस्कळीत होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे, “असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप मध्ये प्रा. गोकुळ कंठाळे यांनी, स्त्री- पुरुष किंवा मुलगा -मुलगी असा लिंगभेद करणे म्हणजे समाजाची विकृत मनोवृत्ती आहे.आजच्या आधुनिक युगात असा भेदभाव करणे म्हणजे कुटुंब व्यवस्थेतील दोन घटकांमध्ये वितुष्ट निर्माण करण्यासारखे आहे, त्यामुळे सर्व स्त्री पुरुष समान असून त्यांना समान अधिकार व मानसन्मान मिळाला पाहिजे,”अशी भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. विनोद उगले, तर प्राध्यापक चंद्रकांत बनसोडे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रदीप मांजरे प्रा. डॉ. जालिंदर लोणके  आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील शिबिरार्थी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
Back to top button