बीड

अट्टल महाविद्यालयात बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त काव्यगायन स्पर्धा संपन्न 

अट्टल महाविद्यालयात बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त काव्यगायन स्पर्धा संपन्न
गेवराई, दि. २७ (प्रतिनिधी) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र.भ.अट्टल कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त प्राचार्य प्रो. रजनी शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली  काव्यगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नवनाथ गोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक प्रा. आशिष वाघुंबरे होते.
विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेल्या ‘अरे संसार संसार’, ‘मन वढाय वढाय’, ‘धरत्रीच्या कुशीमध्ये’, ‘अरे खोप्यामध्ये खोपा’ अशा विविध कवितांचे सादरीकरण करून स्पर्धेत सहभाग घेतला.
सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्रेमदास राठोड यांनी बहिणाबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, बहिणाबाईंनी आपल्या काव्यातून ग्रामीण जीवनाचे सुंदर आणि सहज वर्णन केले आहे. बहिणाबाईंच्या काव्याचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा या दृष्टिकोनातून यावेळी  मान्यवरांच्या हस्ते भित्तिपत्रकाचे अनावरण केले. प्रा. प्राध्यापक सुनील शिंपी यांनी विद्यार्थ्यांशी अहिराणी भाषेतून संवाद केला. अहिराणी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजीवनी डावकर यांनी तर आभार प्रा. सोनाली रामटेके यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
Back to top button