बीड

स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा खर्डा येथे सत्कार संपन्न

स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा खर्डा येथे सत्कार संपन्न

केंद्रप्रमुख केशव गायकवाड व विश्वस्त मुकुंदराज सातपुते यांच्या हस्ते गुणवंतांचा सन्मान..

जामखेड प्रतिनिधी:-विविध स्पर्धा परीक्षा गुणवंत शिवराज अशोक जाधव इ2री शाळा -खर्डा (मुले),हिंदवी चंद्रकांत अरण्ये इ.4थी शाळा खर्डा (मुली),ऋत्वी रविंद्र धस इ.1ली-शाळा तेलंगशी व शशांक शरद पाचरणे इ.2री शाळा खर्डा मुले यांचा खर्डा येथे सन्मान करण्यात आला.*

*केंद्रप्रमुख केशव गायकवाड व विकास मंडळाचे विश्वस्त तथा जामखेड तालुका शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष श्री.मुकुंदराज सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला.या विद्यार्ध्यांचे मार्गदर्शक शिक्षक श्री चंद्रकांत अरण्ये यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.*
*शिवराज जाधव या विद्यार्थ्यांची BTS स्पर्धा परीक्षेतून मोफत ISRO विमान प्रवासासाठी निवड झाली आहे.लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षेत त्याने 150 पैकी 150 गुण मिळवले आहेत.हिंदवी अरण्ये हिने लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षेत 300 पैकी 300 गुण घेऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.ऋत्वी धस हिने लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षेत 150 पैकी 148 गुण घेऊन राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.शशांक शरद पाचरणे याने150 पैकी 146 गुण मिळवून राज्यात तृतीय आला आहे.*
*यावेळी चंद्रकांत अरण्ये,नितेश महारनवर,भाऊसाहेब डिडूळ,सुशेन चेंटमपल्ले,ज्ञानेश्वर सपकाळ,गोविंद भोसले, प्रकाश राठोड,गणेश भालेराव,चांगदेव पारधी,अशोक जाधव,रविंद्र धस व नागेश धनवे हे शिक्षक उपस्थित होते.*
*यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांचे केंद्रप्रमुख केशव गायकवाड,विस्तारअधिकारी जालिंदर खताळ व संजय नरवडे,गटशिक्षणाधिकारी विजय शेवाळे,गटविकासअधिकारी शुभम जाधव यांच्यासह सरपंच संजीवनीताई पाटील यांनी अभिनंदन केले आहे.*

Back to top button