📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

विखे फाउंडेशनच्या पुढाकाराने जामखेडमध्ये दिव्यांगांना आधार १०० हून अधिक दिव्यांगाना कृत्रिम हात पायांचे वाटप ,शिबिर यशस्वी

विखे फाउंडेशनच्या पुढाकाराने जामखेडमध्ये दिव्यांगांना आधार
१०० हून अधिक दिव्यांगाना कृत्रिम हात पायांचे वाटप ,शिबिर यशस्वी
जामखेड, दि. १९ जुलै (प्रतिनिधी) –डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जिल्हा परिषद अहिल्यानगर, एलिम्को (कानपूर) व एस. आर. ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मराठी मुला-मुली) येथे अस्थिव्यंग दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम हात-पाय बसविणे, मोजमाप व तात्काळ वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये कर्जत-जामखेड तालुक्यातील सुमारे १०० दिव्यांग बांधवांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विजय शेवाळे, केंद्रप्रमुख राम निकम, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युमभाई सुभेदार, आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक करण ढवळे, डॉ. यशस चुंबळे, ॲड. अरबाज सय्यद, सामाजिक कार्यकर्ते नासीर सय्यद, प्रफुल्ल गवारे, प्रमोद आढे, दीपाली नागरगोजे, शिवाजी वडेकर, राहुल भालेराव, संदीप शिंगणापूरे, संतोष आडसुळ, अक्षय गन्हे आदींची उपस्थिती होती.
या वेळी बोलताना आकाश बाफना म्हणाले, “विठ्ठलराव विखे फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी हे शिबीर आयोजित केल्याबद्दल खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे विशेष आभार. तसेच दिव्यांगांसाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या निधी व वेतनवाढीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार व्यक्त करतो.तसेच दिव्यांगांसाठी पुढील काळात कोणतीही मदत आवश्यक असल्यास, ती आदर्श फाऊंडेशन मार्फत दिली जाईल
प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष नय्युमभाई सुभेदार म्हणाले, मंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार आम्ही दिव्यांगांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर आहोत.”
शिबीरात लाभार्थ्यांचे मोजमाप घेऊन त्यांच्यासाठी योग्य कृत्रिम अवयव तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले.
Back to top button