डेरवण येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेसाठी जामखेडच्या श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या चौघांची निवड

डेरवण येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेसाठी जामखेडच्या श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या चौघांची निवड
जामखेड प्रतिनिधी: शनिवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सोहम स्पोर्ट्स अकादमी अहिल्यानगर येथे झालेल्या जिल्हा अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेत श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेचे चि.रितेश खुपसे याने रौप्यपदक, चि.कृष्णा जगदाळे याने सुवर्णपदक,चि.कृष्णा जगताप याने सुवर्णपदक,कु.स्नेहल भोसले हीने सुवर्णपदक पटकावल्याने या चार जणांची राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली असून २७ ते ३० नोहेंबर २०२५ रोजी डेरवण,जिल्हा रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद मल्लखांब निवड स्पर्धेत ते आपले नशिब आजमावणार आहेत.
या खेळाडूना यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रशिक्षक श्री संतोष (बबलु वस्ताद) टेकाळे,सहप्रशिक्षक अमोल निमोणकर,अहिल्यानगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच तांत्रिक समितीचे सर्व सदस्य यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या सर्व कार्यकारिणीने पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



