बीड
नवगण राजुरी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन नवगण राजुरी

नवगण राजुरी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
नवगण राजुरी
नवगण राजुरी
दि. 12 (प्रतिनिधी):- मंगलमूर्ती देवस्थान नवगण राजुरी येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी गणेश जन्म महोत्सवा निमित्त दि. 12 ते 19 सप्टेंबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या माजी खासदार स्व.केशरकाकू क्षीरसागर आणि सोनाजीराव क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून आरंभ झालेल्या आणि आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणाऱ्या या सप्ताहात दैनिक कार्यक्रमात पहाटे 4 ते 5 काकडा आरती, सकाळी 10 ते 12 गाथा भजन, दुपारी 3 ते 5 गणेशपुराण, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन त्यानंतर भजन, भारुड होणार असून यात ह.भ.प. जनार्दन महाराज शिंदे मत्सेंद्रगड यांचे हरिकीर्तन संपन्न झाले तर ह.भ. प. सुधाकर महाराज वाघ पैठण, रामकृष्ण महाराज रंधवे पाटोदा, दीपक महाराज बादाडे काडीवडगाव, पुष्कर महाराज गोसावी, राधाताई महाराज सानप महासांगवी, भरत महाराज जोगी परळी यांचे हरिकीर्तन होणार असून सोमवार दि. 14 रोजी श्री गणेशास गंगेच्या कावडीने जलाभिषेक घालण्यात येईल. रात्री 11 ते 12 या वेळेत आरती, उपासना व गणेश जन्माचे भजन होईल. शुक्रवार दि. 18 रोजी महाद्वारचा अनादिकाला होईल व नंतर श्रींच्या पालखीची गावातून भव्य मिरवणूक निघेल. या सप्ताहाची सांगता शनिवार दि. 19 रोजी ह.भ.प. प्रेममूर्ती महंत शिवाजी महाराज श्रीक्षेत्र संस्थान नारायण गड यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून त्यानंतर महाप्रसाद होईल तरी भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन समस्त ग्रामस्थ मंडळ नवगण राजुरी यांनी केले आहे.