तीस वर्षांपासून जनसेवेसाठी कार्यतत्पर – प्रकाश काळे नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात

तीस वर्षांपासून जनसेवेसाठी कार्यतत्पर – प्रकाश काळे नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात
लोकांशी जिव्हाळ्याचं नातं हीच काळे यांच्या कार्यशैलीची ओळख
जामखेड प्रतिनिधी :
राजकारण म्हणजे केवळ सत्ता नाही, तर जनतेची सेवा, या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जामखेड तालुका सरचिटणीस आणि आदिवासी जिल्हा पारधी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश माणिकराव काळे यांनी आता नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरायचा निर्णय घेतला आहे.
प्रभाग क्रमांक ५ (अनुसूचित जमाती राखीव) या ठिकाणावरून उमेदवारी जाहीर करताना त्यांनी सांगितले की, मी आजपर्यंत कार्यकर्त्याच्या भूमिकेतून लोकांसाठी काम केले; आता थेट लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी घ्यायची आहे.माझा लढा परिवर्तनासाठी आहे.
गेल्या तीन दशकांपासून फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ध्येय धोरणाशी एकनिष्ठ, प्रामाणिक आणि जनसामान्यांच्या बाजूने उभे राहणारे कार्यकर्ते म्हणून प्रकाश काळे यांचे उल्लेखनीय काम आहे. १९९९ साली शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी पक्षाचे कार्य चालू ठेवले. २००० साली राजेंद्र कोठारी यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस, तर २०१५ साली तालुका सरचिटणीसपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली.
फक्त राजकारणातच नव्हे, तर समाजकारणातही काळे यांनी भरीव काम केले आहे. आदिवासी समाजासाठी खावटी योजना, पन्हाळी पत्रे, प्रकल्प योजनांचे लाभ देण्यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा करून मिळवून दिला. आदिवासी समाजच नाही तर इतर समाजाच्या हक्कांसाठी झटणारा हा कार्यकर्ता आता जनतेचा प्रतिनिधी म्हणून विकासाच्या नव्या वाटेवर पाऊल टाकत आहे.
एकनिष्ठ, संयम, आणि लोकांशी जिव्हाळ्याचं नातं हीच काळे यांच्या कार्यशैलीची खरी ओळख.
आगामी निवडणुकीत त्यांचा संघर्षातून सेवेकडे हा प्रवास जामखेडकरांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.



