६१ वर्षांनंतर जामखेडमध्ये प्रथमच राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथी उत्साहात साजरी

६१ वर्षांनंतर जामखेडमध्ये प्रथमच राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथी उत्साहात साजरी
विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात ह.भ.प.ईश्वरी महाराज नागरगोजेंचे भावपूर्ण किर्तन
जामखेड प्रतिनिधी :
राष्ट्रसंत भगवान बाबा यांची पुण्यतिथी जामखेड शहरात तब्बल ६१ वर्षांनंतर यावर्षी प्रथमच श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त जामखेड शहरातील विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात सकाळी १० ते १२ या वेळेत हरिभक्त परायण ईश्वरी (महाराज) नागरगोजे यांचे भावपूर्ण कीर्तन संपन्न झाले.या कार्यक्रमासाठी जामखेडच्या नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी या उपस्थित होत्या.कार्यक्रमादरम्यान शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन सुभाष बांगर तसेच दहावी परीक्षेत प्रथम आलेला विद्यार्थी श्रेयस महादेव राख यांचा सन्मान करण्यात आला.
या पुण्यतिथी सोहळ्यासाठी जामखेड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. किर्तन व गायन सेवेसाठी ह.भ.प. जगन्नाथ धर्माधिकारी, ह.भ.प.दादा (महाराज) सातपुते, ह.भ.प. मुरूमकर (महाराज), ह.भ.प. राजगुरू (महाराज), ह.भ.प. संतोष (महाराज), ह.भ.प. गुरसाळे (महाराज), ह.भ.प. संतोष (महाराज) बारगजे,ह.भ.प.महारुद्र नागरगोजे,ह.भ.प.बाळासाहेब गाडे (महाराज), ह.भ.प. ज्योतीताई माळी, ह.भ.प.मनीषाताई बोराटे, सुरेखाताई मोहोळकर, ह.भ.प. रेखाताई घुले, ह.भ.प. सुनिताताई बोराटे आदी मान्यवरांनी सहभाग घेतला.
उद्योगपती देविचंद डोंगरे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. किर्तनकारांचे यजमान म्हणून नगरसेवक ॲड. प्रवीण सानप यांनी जबाबदारी सांभाळली, तर भजनी मंडळासाठी माजी नगरसेवक अमित चिंतामणी यांनी मोलाचे योगदान दिले. सर्व समाजातील नागरिकांनी लोकवर्गणीतून या कार्यक्रमाची यशस्वी पूर्तता केली.पहिल्याच वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या पुण्यतिथी सोहळ्यास जामखेडकरांनी उदंड प्रतिसाद दिला. किर्तनादरम्यान ईश्वरी (महाराज) नागरगोजे यांनी संत भगवान बाबांचे जीवनचरित्र व उपदेश प्रभावीपणे मांडले.एक एकर जमीन विकावी, पण मुलांना शिकवावे, हा संत भगवान बाबांचा शिक्षणाचा संदेश सर्व समाजाला देण्यात आला.



