बीड

जामखेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम

जामखेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम

तरुणांनी शिक्षण, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा स्विकार करावे – महेश पाटील

जामखेड | प्रतिनिधी:-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा युवा पिढीने आदर्श घेण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना ही केवळ कायद्याची चौकट नाही, तर ती सामाजिक समतेचा मूलमंत्र आहे. तरुणांनी शिक्षण, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा स्वीकार करून समाज परिवर्तनात आपले योगदान दिले पाहिजे. असे मत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी व्यक्त केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक समतेचे प्रणेते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जामखेड शहरात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
शहरातील खर्डा चौक यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.
यावेळी बोलताना प्राचार्य विकी घायतडक म्हणाले, महापुरुषांमुळे समाजात माणुस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला.आज रोजी संविधानाच्या माध्यमातून मानवाच्या कल्याणासाठी संविधान अमलात आणण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे योगदान आहे.
संविधान चौक, सिद्धार्थ नगर, सदाफुले वस्ती, मिलिंद नगर, आरोळे वस्ती, महात्मा फुले नगर तसेच खर्डा चौक येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये बौध्दाचार्य अशोक आव्हाड यांनी त्रिशरण व पंचशील घेऊन तसेच मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या अभिवादन सोहळ्यात जेष्ठ नेते प्रा.मधुकर राळेभात, सुरेश भोसले,ॲड.डाॅ.अरुण जाधव, प्रा.कैलास माने, प्रकाश सदाफुले,शरद कार्ले,अझहरभाई काझी, अमित चिंतामणी, सागर सदाफुले,दिगंबर चव्हाण, मोहन पवार, अमित जाधव,शामिर सय्यद,संध्या सोनवणे, प्रकाश काळे, संजय काशिद,प्रा.लक्ष्मण ढेपे, संपत राळेभात,अवधूत पवार, संभाजी ढोले,बापूसाहेब गायकवाड,मुख्तार सय्यद,बापूसाहेब ओव्हळ,विनायक राऊत,उमर कुरेशी,दिपक सदाफुले, विशाल अब्दुले,संतोष गव्हाळे, प्रवीण बोलभट, आण्णा ढवळे, विक्रांत घायतडक, अमित गंभीर,उद्धव हुलगुंडे, मनोज घोडेस्वार,सुनील जावळे, प्रभाकर सदाफुले, संभाजी आव्हाड, योगेश अब्दुले,संजय घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. विकी घायतडक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले. आयोजनासाठी अमोल सदाफुले, गौरव सदाफुले, कबीर घायतडक, सुमित घायतडक, प्रितम घायतडक, स्वप्नील सदाफुले, सुमित घायतडक संतोष गव्हाळे मित्र मंडळ, सदाफुले वस्ती मित्र मंडळ यांनी विशेष मेहनत घेतली.

Back to top button