बीड
जि.प.प्राथ.शाळा तपनेश्वर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी

जि.प.प्राथ.शाळा तपनेश्वर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी
जामखेड प्रतिनिधी – शहरातील तपनेश्वर विभातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींचे भाषणे झाली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष धनराज पवार,उपाध्यापिका जया चौभारे, सुजाता राक्षे, शुभांगी साळुंके, शितल कदम आदी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.



