बीड
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा 29 मे रोजी बीड जिल्ह्यात शिवसंवाद दौरा!

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा 29 मे रोजी बीड जिल्ह्यात शिवसंवाद दौरा!
*सर्व पदाधिकारी-शिवसैनिकांनी आवर्जून उपस्थित राहावे-जगताप, मुळूक, गलधर, नवले*
=================
बीड, प्रतिनिधी- राज्यभरात शिवसेना पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी संसदरत्न डॉ श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रभर शिवसंवाद दौऱ्याची कंबर कसली असून दि. 29 मे 2026 रोजी त्यांचा महत्त्वपूर्ण बीड जिल्हा दौरा पार पडणार आहे. या दौऱ्यात बीड जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये तळागाळातील शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जाणार असून पक्ष संघटन बळकट करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे या बैठकींसाठी शिवसेना पक्षातील विविध मंत्री व वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहणार आहेत.
दौऱ्याची सुरुवात सकाळी 10 वाजता केज शहरातील हॉटेल अर्जुन पॅलेस येथे होणाऱ्या केज-परळी मतदारसंघाच्या बैठकीने होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता हॉटेल नीलकमल येथे बीड-माजलगाव मतदारसंघाची बैठक पार पडेल तर दिवसातील शेवटची बैठक सायंकाळी 5 वाजता पाटोदा येथे आष्टी-गेवराई मतदारसंघासाठी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकींमध्ये विधानसभा क्षेत्रनिहाय संघटनात्मक आढावा, तालुकानिहाय माहिती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक नियोजन, संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा, S.E.O. नेमणुका, BLA यादी व प्रशिक्षण नियोजन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.
या बैठकींसाठी शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना, अल्पसंख्यांक आघाडी, बांधकाम कामगार सेना, अध्यात्मिक आघाडी, शेतकरी सेना, ओबीसी व्ही जे एन टी सेल, डॉक्टर सेल, विधी सेल, एसटी कामगार सेना, वाहतूक सेना, शिव उद्योग सेना आणि वैद्यकीय मदत कक्ष यांसह सर्व अंगीकृत संघटनांच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी, शाखाप्रमुख, बूथप्रमुख आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळूक आणि जिल्हाप्रमुख स्वप्नील भैय्या गळधर आणि जिल्हाप्रमुख चंद्रकांत नवले यांनी केले आहे.



