बीड
प्रगत,निपूण महाराष्ट्र कार्यक्रम जरेवाडी पॅटर्न शैक्षणिक कार्यक्रमाची -आ.मदार सुरेश धस यांनी केली पडताळणी…

प्रगत,निपूण महाराष्ट्र कार्यक्रम जरेवाडी पॅटर्न शैक्षणिक कार्यक्रमाची -आ.मदार सुरेश धस यांनी केली पडताळणी…
आष्टी ( प्रतिनिधी ) :- दि. 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भवरवाडी ता.आष्टी या शाळेला आ.सुरेश धस यांनी अचानक भेट देऊन राज्यात सुरू असलेल्या प्रगत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत जरेवाडी पॅटर्न कृतीपत्रिका अध्ययन क्षमता दि. 21/ 4 /2025 च्या वाचन स्तर, लेखन स्तर, संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया स्तराची गुणवत्ता पडताळणी केली…
आ. सुरेश धस यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळेतील मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे आणि ठिकाणी देखील नवीन शैक्षणिक धोरणानुसार सतर्क रहावे आणि आपला शैक्षणिक दर्जा राखावा यासाठी व्ही.रमणी पॅटर्न बीड जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यास सुरुवात झालेली आहे तसेच निपुण भारत या डायरेक्ट कृती कार्यक्रमांतर्गत देखील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे आमदार सुरेश धस यांनी याबाबत आग्रहपूर्वक हा कार्यक्रम राबवण्याविषयी मोठे प्रयत्न केलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून जरेवाडी पॅटर्ननुसार प्राथमिक शाळा भवरवाडी अंतर्गत कार्यरत शिक्षकांनी धाराशिव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव चे प्रा.डॉ.
जाटनुरे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार अध्यापनातील विविध उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे भाषा वाचन, लेखन, संख्याज्ञान, संख्या वरील क्रिया या क्षमतांचा अपेक्षित विकास झाल्याचे पाहून आ.सुरेश धस यांनी त्यांचे कौतुक केले…
विद्यार्थ्यां समवेत खेळीमेळी च्या वातावरणात संवाद साधून विद्यार्थ्यांकडून चावडी वाचनही करून घेतले.
लेखन कौशल्य विकासा अंतर्गत राबवण्यात येत असलेला सुंदर हस्ताक्षर या उपक्रमाची पाहणी करताना शाळेतील सर्वच 100% विद्यार्थ्यांचे अतिशय सुंदर हस्ताक्षर पाहून आमदार महोदयांनी सुंदर हस्ताक्षराचे मार्गदर्शक शिक्षक अनिल बेदरे सर यांचे कौतुक केले.
याप्रसंगी शाळेला नवी प्रशस्त इमारत आणि कमी असलेल्या सर्व भौतिक सुविधांची येत्या शैक्षणिक वर्षात सुविधा करून देण्यात येईल अशी आ.सुरेश धस यांनी घोषित केले.
याप्रसंगी सरपंच भरत भवर, संजय भवर, किसन भवर, दादासाहेब भवर, नवनाथ भवर, तुकाराम भवर, प्रविण भवर, हनुमंत मोरे, दत्ता भवर, सागर भवर, विक्रम भवर, संतोष मोरे, संतोष भवर, शरद बागल, गोवर्धन वाहटुळे, अशोक भवर, राम भवर, बंडू भवर, कल्याण भवर, भास्कर भवर, परसराम भवर, शेषेराव भवर, लखन भवर, छगन इंगवले मुख्याध्यापक काकडे सर व अनिल बेदरे सर इ. व अनेक ग्रामस्थ शाळेच्या परिसरात जमा झाले होते



